मस्तपैकी झोपून व्यायाम करणार का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 06:40 PM2020-05-14T18:40:19+5:302020-05-14T18:44:55+5:30
नी टू चेस्ट स्ट्रेचेस.
काय, मजा येतेय ना, व्यायाम करायला?
आता लॉकडाऊनच्या काळात आणि घरात बसल्या बसल्या आणखी करणार तरी काय काय? म्हणूनच तुम्हाला कंटाळा येणार नाही, आणि करायलाही मजा येईल असे हटके व्यायाम मी तुम्हाला सांगत असते.
झोपायला, लोळायला, झोपून टाइमपास करायला तुम्हाला फार आवडतं, त्यामुळे आता अधूनमधून काही झोपून करायचे व्यायाम मी तुम्हाला सांगणार आहे.
असाच एक हटके व्यायाम आहे, ‘नी टू चेस्ट स्ट्रेचेस’ एक्सरसाईज.
अर्थातच आपला गुडघा छातीला लावायचा स्ट्रेचिंग एक्सरसाइज.
हा व्यायाम आपल्याला उभ्यानंही करता येतो, पण नीट केला नाही, तर त्यात तोल जाण्याचा धोका असतो. त्यामुळे आधी मस्तपैकी आपण झोपून हा व्यायाम करू.
कसा कराल हा व्यायाम?
1- नेहमीप्रमाणो एखादी चटई किंवा मॅट जमिनीवर अंथरा. त्यावर पाठ टेकून झोपा.
2- आता आपला उजवा पाय वर गुडघ्यातून दुमडून वर उचला आणि दोन्ही हातांनी तो छातीवर दाबा.
3- आपल्या पोटाचे स्नायू टाइट ठेवा आणि आपल्या पाठीचा मणका जमिनीला दाबून धरा.
4- आपला गुडघा छातीवर दाबलेल्या स्थितीत सुमारे पाच सेकंद राहा.
5- परत मूळ स्थितीत या.
6- आता डाव्या पायानं हीच कृती परत करा.
7- प्रत्येक पायानं ही कृती दहा-दहा वेळा करा.
यामुळे काय होईल?
1- यामुळे दुहेरी फायदा होईल. पोटाचा आणि पाठीचाही व्यायाम यामुळे होईल.
2- विशेषत: लोअर बॅकसाठी हा व्यायाम खूपच उपयुक्त आहे.
3- शरीराची लवचिकता वाढेल.
4- शरीरातील स्टिफनेस कमी होईल.
5- जॉइंटमधील फ्लेक्जिबिलिटी वाढेल.
6- तुम्ही खूप दमला असाल, दिवसभर खूप काम झालं असेल, एकाच जागी बसून अवडघला असाल, तर हा व्यायाम तुम्हाला एकदम रिलॅक्स करेल.
बघा करून आणि सांगा मला, एकदम भारी वाटतं की नाही ते.
- तुमचीच ‘रबरी’ मैत्रीण, ऊर्जा