हा डबल हवाहवाई  व्यायाम केलाय कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 11:06 AM2020-05-07T11:06:07+5:302020-05-07T11:09:28+5:30

करा तुमचे पाय बळकट आणि मग बघा तुम्ही कसे ताठ चालायला लागाल ते!

lockdown : exercise for kids, stay at home activity. | हा डबल हवाहवाई  व्यायाम केलाय कधी ?

हा डबल हवाहवाई  व्यायाम केलाय कधी ?

Next
ठळक मुद्देसाइड स्क्वॉट्स

आता रोज तुम्ही व्यायाम करताय. नक्की करताय ना?
एखाद दिवस दांडी मारली तर हरकत नाही, पण शक्यतो, आठवडय़ाचे किमान पाच दिवस व्यायाम झालाच पाहिजे, अशी सवय स्वत:ला लावा. खूप व्यायाम करायची गरज नाही, पण आपल्या शरीराला व्यायामाची सवय मात्र नक्कीच पाहिजे. ही सवय एकदा का तुम्हाला लागली, की मग तुम्हालाच स्वस्थ बसवणार नाही. 
पण लक्षात ठेवा, व्यायामाच्या बाबतीत अति करायचं नाही, तसंच मध्येच सोडूनही द्यायचं नाही. 
कारण ही चांगली सवय आहे, शिवाय आपल्या आयुष्यात त्याचा खूप आणि प्रत्येक गोष्टीसाठी उपयोग होतो. आपली शक्ती वाढते, उत्साह वाढतो, आपली आजारपणं कमी होतात.
त्यामुळे शक्यतो, व्यायाम चुकू द्यायचा नाही, पण आठवडय़ातून एक दिवस व्यायामाला सुटीही द्यायची. इतर वेळी थोडा का होईना, आपल्याला आवडेल तो व्यायाम जरूर करायचा. 
आज आपण शिकू या आणखी एक नवा व्यायाम. पायांचा. 
हेदेखील स्क्वॉट्सच आहेत, पण थोडे वेगळे आणि याची डिफिकल्टी लेवल किंचित अवघडही आहे. 
आपल्या आजच्या व्यायामाचं नाव आहे, ‘साइड स्क्वॉट्स’!


कसा कराल हा व्यायाम?
1- सरळ उभे राहा.
2- दोन पायांत थोडं अंतर घ्या. 
3- मागे मी तुम्हाला सांगितलं होतं हवेत बसायला, तसं हवेत दोन सेकंद बसायचं.
4- हे करताना पाठ ताठ ठेवायची.
5- एकदा हवेत बसून झालं की पुन्हा सरळ मुळ स्थितीवर यायचं.
6- एकदा एक पाऊल उजीवकडे सरकवून हवेत बसायचं, नंतर मुळ स्थितीत येऊन पुन्हा डावीकडे एक पाऊल सरकून हवेत बसायचं.
7- असं सुरुवातीला दहा वेळेस करा.
काय होईल या व्यायामानं?
1- नेहेमीच्या स्क्वॉट्सपेक्षा हे वेगळे आहेत आणि याचा फायदाही जास्त आहेत.
2- यामुळे तुमचं ढू आणि मांडय़ांचे स्नायू बळकट होतील.
3- मांडय़ांच्या बाहेरच्या बाजूंत ताकद येण्यासाठी तर यांचा खूप उपयोग होतो.
4- यामुळे छान कार्डिओ एक्सरसाईज होतो.
5- हृदय बळकट होतं. 
करा तुमचे पाय बळकट आणि मग बघा तुम्ही कसे ताठ चालायला लागाल ते!
- तुमचीच ‘डबल हवाहवाई’, ऊर्जा

Web Title: lockdown : exercise for kids, stay at home activity.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.