‘टाटा करो’ना असा काही व्यायाम असतो ? -कर के देखो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 06:54 PM2020-04-10T18:54:55+5:302020-04-10T18:58:31+5:30
या पायानं कोरोनाला टाटा करा.
तुम्ही मित्र-मैत्रिणी एकत्र आले की कशी धम्माल करता ना? गप्पा मारताना किती वेळ निघून जातो, हे कळतच नाही. मग तुम्ही शाळेत असा, क्लासला असा किंवा घरी. कुठेही असलो तरी आपलं मित्र-मैत्रिणींचं टोळकं जिथेतिथे खुसफुस करत असतंच. मला माहीत आहे, शाळेत टिचर शिकवत असतानाही ब:याचदा तुमच्या गप्पा सुरू असतात ते! टिचरची पाठ वळली रे वळली, त्यांचं लक्ष दुसरीकडे किंवा फळ्यावर काही लिहायला घेतलं की लगेच तेवढय़ा वेळात तुम्ही डोळ्यांच्या इशा:यांनी म्हणा, हावभाव करून म्हणा, किंवा कुजबुजत का होईना, तुम्ही लगेच गप्पा मारून घेताच!
आणि थोडय़ा वेळासाठी का होईना, टाटाùù बाय बायùù करायची वेळ आली की तुम्हाला किती वाईट वाटतं ना?
हो, मला माहीत आहे ते.
पण आज तोच व्यायाम मी तुम्हाला शिकवणार आहे. टाटा, बाय बाय कसं करायचं ते!
नाही, तुमच्या मित्र-मैत्रिणींना नाही टाटा करायचा. ते आता आपल्या जवळ आहेतच कुठे, टाटा करायला!
पण आजच्या व्यायामात एक गंमत आहे. आपल्याला टाटा करायचाय, पण तो हातानं नाही, पायानं!
काय करायचं?
1. झोपा एका कुशीवर. हात डोक्याखाली घ्या.
2. अरे, सांगितलं, म्हणून काय लगेच खरोखर नाही झोपायचं! टीव्ही पाहाताना काही वेळा तुम्ही सोफ्यावर बसल्या बसल्या झोपता किंवा झोपल्या झोपल्या बसता तसं. हां, बरोब्बर. चित्रत मी झोपलेय ना, तस्संच.
3. दुसरा हातानं जमिनीचा आधार घ्या. आता हळूहळू उचला वरचा पाय. जास्त ताण द्यायचा नाही, पण दोन्ही पायातला कोन नव्वद अंशाचा झाला तर चांगलं.
4. काही सेकंद थांबा. या पायानं कोरोनाला टाटा करा. नंतर दुस:या पायानं तसंच.
5. त्या कोरोनाला एवढा राग येईल ना. आणि आपल्याला तर तेच हवं आहे. राग, चिडचिड केली की कोणाचंच डोकं नीट चालत नाही. आणि मग ते चुका करतात.
6. यामुळे तुमच्या पायाच्या, मांडय़ांच्या मसल्समध्ये ताकद येईल आणि मुख्य म्हणजे बसून बसून तुमचं आळसावलेलं ‘ढू’ही फ्रेश होईल!
- तुमची ‘टाटा करो’ना मैत्रीण, ऊर्जा