ऑनलाईन मिटिंगसाठी नवीन सॉफ्टवेअर त्यांनी कसे निवडले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 07:00 AM2020-06-06T07:00:00+5:302020-06-06T07:00:07+5:30
लॉकडाऊनमध्ये मुलं काय शिकली?
- चेतन एरंडे,
मुलं नुसती एकत्र येत नाहीयेत तर बरेच काही शिकत आहेत, हे मुलांनी स्क्रॅच मध्ये तयार केलेल्या गोष्टीवरून समजले. यानिमित्ताने मुले ऑनलाईन मिटिंगसाठी नवीन ऍप्लिकेशन वापरत आहेत, हे पहिल्यांदाच समजले.
‘हे कधी वापरायला सुरु केलं?’’- असं मुलांना विचारल्यावर, आधीच्या ऍप्लिकेशनमध्ये काय त्रुटी होत्या? त्यामुळे त्यांना काय प्रॉब्लेम येत होते? हे प्रॉब्लेम सोडवायचे ठरवल्यावर ऑनलाईन मिटिंगसाठी नवीन सॉफ्टवेअर त्यांनी कसे निवडले? हे सगळे मुद्देसूद सांगितले! एवढेच नाहीत तर हे नवीन ?प्लिकेशन वापरण्यासाठी त्यांनी एकमेकांचे ‘ट्रेनिंग’ कसे घेतले हेही सांगितले.
मुलांना कुठलही काम सांगितलं ना, की मुलं ते काम अध्र्यावर सोडून देतात, त्यासाठी नको नको ती कारण शोधतात अशी मुलांची एक इमेज आमच्या मनात होती. इथे मात्र एक ऍप्लिकेशन चालत नाही तर दुसरं वापर, लॅपटॉप बंद पडला, मोबाईल वापर, लाईट गेले तर सेशनची वेळ बदल एवढंच नाही तर एखादा मित्र त्यादिवशी सेशनला येऊ शकला नाही, तर आज कोणती गोष्ट शिकली हे त्याला समजून सांगण्याची जबाबदारी घे व त्यासाठी वेगळा वेळ काढ हे सगळं ही मुलं लीलया करत होती!
मुलांनी स्क्रॅचची गोष्ट आम्हाला व समूहातील इतर पालकांना सांगितल्यावर अशा प्रकारे शिकावं असं इतर मुलांना सुद्धा वाटू लागलं. त्यामुळे या प्रक्रियेत एक नवा टप्पा आला. तो म्हणजे आता शिकण्यासाठी किमान वयाचे बंधन नव्हते. मोठ्या दादा आणि ताईंना शिकताना बघून आता सहा वर्षाची मुले सुद्धा प्रोग्रामिंग शिकू लागली. त्यांच्यासाठी एक वेगळी बॅच सुरु झाली. ही बॅच चालवण्याची जबाबदारी आधीच्या बॅचमधील मुलांनी घेतली.
एकीकडे स्क्रॅच शिकण्यासाठी नवीन मुले तयार होत असतानाच ज्यांचे आधीच स्क्रॅच शिकून झाले होते, त्यांनी काय केले, हे आपण पुढील भागात बघूया.