अभ्यास करणं आणि घोकंपट्टी करणं यात फरक असतो, हा पाहा असा ..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 07:30 AM2020-05-06T07:30:00+5:302020-05-06T07:30:07+5:30
गणेश काका म्हणतो, काही म्हणजे काही पाठ करू नका! पुढचं पाठ आणि मागचं सपाट होतं त्याने..
आपण अभ्यास करतो म्हणजे अनेकदा प्रश्नोत्तर पाठ करतो. समजून घेऊन अभ्यास करणं आणि घोकंपट्टी करणं यात पुष्कळ फरक असतो जो समजून घेतला पाहिजे.
काही काही जण तर गणितं सुद्धा पाठ करतात.
अर्थात तुम्हाला हे माहीतच असेल. प्रत्येक गोष्ट पाठ करून अभ्यास करणं अनेकदा धोकादायक असतं. म्हणजे अगदी परीक्षेचा विचार केला तर आयत्या वेळी आठवलंच नाही जे पाठ केलंय ते तर?
आपल्या स्मरणशक्तीवर सगळं सोडून न देता, समजून घेण्याचा आपल्या मेंदूच्या क्षमतेवरचा ही वापर करायला शिकलं पाहिजे.
पण कसं?
त्यासाठी युट्युबवरचा डोन्ट मेमराईझ नावाचा चॅनल नक्की बघा. झारीना, गणोश आणि रोहन या तिघांनी मिळून हा चॅनल सुरू केलाय. तुम्हा मुलांना सोप्या पद्धतीने गोष्टी समजावून सांगण्यासाठी अँनिमेशन, चित्र अशा अनेक गोष्टी ते वापरतात. शिवाय त्यांच्या टीममध्ये काही शिक्षण तज्ञ ही आहेत. त्यामुळे तुम्हाला जी माहिती मिळते ती योग्य असते. हा चॅनल चालवणारे म्हणतात योग्य पद्धतीने एखादा विषय समजून घ्यायचा म्हणजे योग्य प्रश्न विचारले पाहिजेत.
गणोश पैला शिक्षक व्हायचं होतं. एकदा त्याच्या बाबांशी बोलताना तो म्हणाला, मला पुढच्या पाच वर्षात 100 मुलांना उत्तम शिक्षण द्यायचं आहे!’
त्यावर त्याचे बाबा म्हणाले, शंभर का, करोडो मुलांना दे. आणि मग चॅनल सुरू झाला.
या चॅनलवर गणित, विज्ञान, वैदिक गणित, लॉजिक अशा अनेक किचकट विषयांना सोपं करून सांगितलं जातं. किंवा भौतिक शास्त्रतल्या किचकट गोष्टी झटपट आणि मुळातून समजून घेण्यासाठी हे चॅनल बघा.
त्यासाठी,
युट्युब वर जा आणि टाइप करा: don't memorise