दोन फुगे, दोन खेळाडू, एक भन्नाट खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 05:20 PM2020-04-16T17:20:47+5:302020-04-16T17:21:24+5:30
फुगा दे, फुगा घे
- राजीव तांबे
खेळण्यासाठी आपल्याला पुढील साहित्य हवे आहे :
2 वेगवेगळ्या रंगाचे फुगे.
हा खेळ खेळण्यासाठी आपल्याला दोघांची गरज आहे.
तर करा सुरू :
आपल्या उजव्या हातात फुगा घेऊन दोघांनी समोरासमोर उभं राहायचं. एकाच्या हातात निळा फुगा आहे. दुस:याच्या हातात लाल फुगा आहे. आता दोघांनी आपापल्या हातातले फुगे उंच उडवायचे. फुगे हवेत असतानाच, पहिल्याने लाल फुगा पकडायचा आहे.
दुस:याने निळा फुगा पकडायचा आहे. फुगे हवेत उडवताना जर त्यांची हवेत टक्कर झाली तर ते दोन फुगे वेगळ्याच दोन दिशांना जातात. अशावेळी त्यांची हवेत अदलाबदली करून त्यांना पकडणं कठीण होतं. म्हणून फुगे हवेत उडवताना दोन फुग्यात अंतर राहील.
याची काळजी घ्या
जर दोन्ही फुगे वेगवेगळ्या उंचीवर उडवले तर त्यांची अदलाबदल करणो सहज शक्य होते. फुगे हवेत उडवल्यानंतर ‘अदलाबदली’ लक्षात ठेवून त्यांना चपळपणो पकडणं हे या खेळातलं मोठं आव्हान आहे.
खेळाचे नियम :
1. फुगे पकडताना कुणाचाही फुगा जमिनीवर पडल्यास दोन्ही खेळाडू बाद.
2. एकदा फुगा हवेत उडविल्यानंतर पुन्हा आपल्याच फुग्याला स्पर्श केल्यास दोन्ही खेळाडू बाद.
3. अदलाबदली न करता फुगे ङोलल्यास दोन्ही खेळाडू बाद.