नासा किड्स पाहिलेत का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 02:47 PM2020-06-01T14:47:57+5:302020-06-01T14:56:22+5:30
नासाने तयार केलेल्या या साईटवर काय नाहीये, ते विचारा!
अमेरिकेतल्या नासा या प्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्थेची खास मुलांसाठीची वेबसाईट आहे नासा किड्स म्हणून. खूप इंटरेस्टिंग साईट आहे ही. या साईटवर तुम्ही गेलात तर इथे मुलांसाठी पुष्कळ गेम्स आहेत, सोप्या भाषेत नासा काय काय काम करतं याची माहिती आहे. मंगळावर नासा पहिल्यांदा गेलं त्याची गोष्ट आहे.
इतकंच नाही तर 2020चं एक सुंदर कॅलेंडर आहे. यात जगभरातल्या मुलांनी त्यांना दिसणा?्या स्पेसवरची चित्र काढलेली आहेत. शिवाय ऍस्ट्रोनॉट्सची माहिती आहे. काही प्रसिद्ध अंतराळवीरांची नावं, फोटो आणि त्यांची कामगिरी यांची माहिती आहे. रॉकेट्स, स्पेस क्राफ्ट आणि स्पेस सूट्स कसे काम करतात हे तुम्हाला या कॅलेंडरमध्ये वाचायला मिळू शकतं.
स्पेसमध्ये गेल्यावर अंतराळवीर नक्की कशाप्रकारचं अन्न खातात याची माहितीही नोव्हेंबरच्या पानावर वाचायला मिळते. आणि कॅलेंडरच्या डिसेंबरच्या पानावर अंतराळवीर स्पेस क्राफ्टमधून परत पृथ्वीवर कसे परत येतात याचीही माहिती आहे. शिवाय मस्त चित्रही आहे. हे कॅलेंडर तुम्ही डाउनलोड करू शकता.
या साईटवर भरपूर फोटो आहेत, गेम्स आहेत, मुलांसाठी पॉडकास्ट आहे ईबुक्स आहेत. तुम्हाला स्पेसची माहिती घ्यायची असेल तर गुगलवर सर्च करा..
nasa kids.
https://www.nasa.gov/kidsclub/index.html