घरात बसूनसुध्दा तुम्ही पक्षी बघू शकता, फक्त एक ‘क्लिक’ करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 01:24 PM2020-05-25T13:24:26+5:302020-05-25T13:26:45+5:30
आज तुम्ही काहीतरी बघणारच, तर काय बघाल?
लॉक डाऊन सुरु झाल्यापासून तुम्ही एक गोष्ट बघितली आहे का?
आपल्या घराच्या आजूबाजूची कबुतरं कमी होऊन निरनिरळ्या रंगीबेरंगी पक्षी आपल्याला दिसायला लागले आहेत. सकाळी पक्षांचा आवाज ऐकू येतो. एरवी वाहनांच्या आवाजात पक्षांचे आवाजच आपल्याला ऐकू येत नाहीत. पण लॉक डाऊननंतर आपण माणसं घरात अडकल्याने पक्षांनाही मुक्तपणो फिरता येतंय. काही पक्षी मित्रंच्या म्हणण्यानुसार पक्षी नेहमीपेक्षा थोडे खालून आता उडताहेत. एरवी माणसांच्या भीतीने ते आभाळात उंच उंच उडत होते. पण आता तशी भीती सध्या तरी त्यांना राहिलेली नाही.
गच्चीत किंवा खिडकीतून अचानक दिसणा?्या लहानमोठ्या आकाराच्या आणि विविध रंगांच्या पक्षांच्या जगाबद्दल आपल्याला माहिती मात्र नाहीये. कारण कुठल्यातरी अभयारण्यात ट्रीपला गेल्यावरच आपण पक्षी निरीक्षणाला जातो. पण आता आपल्याला आपल्या घरातून पक्षी निरीक्षणाची संधी मिळाली आहे. तर याचं सोनं करूया का?
युट्युबवर जाऊन national geographic kids birdsअसा सर्च केलात तर तुम्हाला निरनिराळ्या पक्षांचे अगणित व्हिडीओज बघायला मिळतील. त्याचप्रमाणो तुमच्या नजरेस पडलेल्या एखाद्या पक्षाचं वर्णन लिहून गुगलवर सर्च केलंत तरीही त्या पक्षाची माहिती तुम्हाला मिळू शकेल. हे पक्षी खातात काय, राहतात कसे, रात्रीचे झोपतात का, त्यांची भाषा, एकमेकांशी बोलतात कसे कितीतरी गोष्टींची माहिती तुम्हाला मिळू शकते.
मग वाट कशाची बघताय, इंटरनेट आणि खिडकीतून दिसणारे अगणित पक्षी यांच्या मदतीने पक्षांच्या दुनियेची सैर कराच.