सुटी  संपली ? घ्या आवरायला पसारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 07:10 AM2020-06-04T07:10:00+5:302020-06-04T07:10:02+5:30

तेच ते, अशक्य पसारा पडलेलं तुमचं डेस्क!

new academic year is about to start, school open. | सुटी  संपली ? घ्या आवरायला पसारा 

सुटी  संपली ? घ्या आवरायला पसारा 

Next
ठळक मुद्दे बघा, तुमचं स्वच्छ डेस्क बघून तुम्हालाच किती बरं वाटेल.  

आता शाळा कधी सुरु होतील माहित नाही. 15 जूनला, सरकारने नुकतंच म्हटलं आहे. पण असा विचार आहे, अजून याबाबत नक्की निर्णय जाहीर झालेला नाही. पण म्हणून आपण आपलं डेस्क पसरलेलं कशाला ठेवायचं ना! परीक्षा रद्द झाल्या आणि अचानक तुम्हाला मोठी सुट्टी मिळाली मग डेस्ककडे जरा दुर्लक्षच झालंय, हो ना! मग आता एक काम करा, डेस्क आवरायला घ्याच. 
त्यासाठी काय काय नियोजन कराल?
1) तुमची मागच्या वषीर्ची सगळी पुस्तकं वेगळी काढा. त्याचा गठ्ठा बांधून टाका. म्हणजे कुणाला द्यायचा असेल तर सोपं जाईल. 
2) जुन्या वह्या एकदम रद्दीत देऊ नका. आधी त्या नीट तपासा. त्यातले कोरे कागद काढून घ्या. त्या को?्या कागदांच्या कच्च्या कामाच्या वह्या तुम्हाला करता येतील. 
3) एकदा पेन्सिली आणि रबरांची पाऊचेस बघा. खराब झालेल्या पेन्सिल्स, रबराचे तुकडे फेकून द्या. 
4) पेन्सिल्स, खोडरबर, शार्पनर आणि इतर स्टेशनरी सगळी वेगळी करा. आणि प्रत्येक गोष्ट ठेवायला पाऊचेस, पेन स्टँड्स, बाउल्स वापरा. यातल्या अनेक गोष्टी तुम्ही घरीच बनवू शकता.  त्या कशा बनवता येतील हे ऊर्जार्ने तुम्हाला सांगितलंच आहे. आठवत नसेल तर ऊर्जाच्या ऑनलाईन पेजवर जाऊन परत एकदा बघा. 
5) गोष्टीची पुस्तकं वेगळी करा. घरभर कुठे कुठे पडली असतील तर ती गोळा करून आणा. 
6) कोरे कागद, रंग, ब्रश असं सगळं वेगवेगळं करा. चित्रकलेच्या वह्या एकत्र करा. 
7) आर्ट आणि क्राफ्टचं साहित्य ठेवायला एक वेगळी पिशवी किंवा बॉक्स करा. 
8) हे सगळं करून झालं की तुम्हाला सुट्टीला जे जे म्हणून लागणार आहे ते वर ठेवा बाकी गोष्टी खणात जाऊद्या. 
9) मागच्या वर्षीची वह्या पुस्तकं कुठे ठेवायची ते आईबाबांना विचारा. त्यानुसार गठ्ठे जाऊ द्या. 
10) बघा, तुमचं स्वच्छ डेस्क बघून तुम्हालाच किती बरं वाटेल.  

Web Title: new academic year is about to start, school open.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.