तेलाचे गोळे पाण्यात नाचवता येऊ शकतात.. कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 07:00 AM2020-05-26T07:00:00+5:302020-05-26T07:00:12+5:30
नाचणारं तेल
- मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
साहित्य:
काचेचा उंच पेला, पाणी, तेल, साखर, चमचा.
कृती :
1. एक काचेचा उंच पेला घ्या. तो अर्धा भरेल इतके पाणी त्यात टाका.
2. त्याच्यावर दोन सेंटीमीटर जाडीचा थर होईल इतके तेल ओता.
3. तेलाच्या थरावर चमच्याने थोडी थोडी साखर टाका.
4. काही साखर जड होऊन तळाशी जायला लागली की साखर टाकणो थांबवा.
5. साखरे बरोबर तेलाचा गोळा खाली पाण्यात जाईल. तळाशी गेला की पुन्हा वर येईल.
6. तेलाचा दुसरा गोळा खाली जाईल. तेलाच्या गोळ्याच्या या हालचाली कितीतरी वेळ चालू राहातील.
हे असे का होते?
1. साखरेच्या वजनाने तेल पाण्यात ढकलले जाते.
2. पाण्यात गेल्यावर त्याचा गोळा होतो. पाण्याच्या उद्धरण शक्तीमुळे तो पुन्हा वर ढकलला जातो.
3. त्याबरोबर थोडी साखरही तेलाच्यावर ढकलली जाते आणि पुन्हा पुन्हा ते घडत राहाते.