आय वूड लाईक टू मिट यु ऑल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 04:27 PM2020-05-29T16:27:15+5:302020-05-29T16:35:16+5:30
onlineशाळा म्हणजे असतं तरी काय?
यु इंडियन्स आर लव्हली , आय वूड लाईक टू मिट यु ऑल!’
- सेनेट उद्गारली. आणि मुलांनीही तिला प्रतिसाद दिला.
आपल्याला अनेकदा पाश्चात्य देशांचे , तिथल्या राहणीमानाचे आकर्षण असते. पण बहुतांश पाश्चात्य देशांतील मुलांना भारत का आवडतो माहितीय का? तर बॉलीवूड मुळे. अर्जेन्टिना पासून व्हिएतनाम पयर्ंतच्या अनेक देशांतील शाळांतील मुलांना आमची मुले , तुम्हांला भारताबद्दल काय माहिती आहे? असा प्रश्न जेंव्हा विचारतात तेंव्हा बॉलीवूड चित्रपट हे उत्तर सर्वाधिक वेळा मिळाले आहे. त्यांना आपल्याकडचे चित्रपट आणि त्यातील कलाकार प्रचंड आवडतात, अनेकांना हिंदी चित्रपटातील गाणी पाठ असतात. आणि मग जेंव्हा अशी गाणी दोन्ही शाळेतील मुले म्हणू लागतात तेंव्हा मात्र एकच कल्ला होतो.
त्यांना आपल्याकडील तिखट जेवणाविषयी फार उत्सुकता असते. एकदा तरी मी साडी नेसणार अशी इच्छा अनेक देशांतील मुलीनी आमच्या ट्रीप दरम्यान व्यक्त केलेली आहे. किती भारी असत ना कि आपण, आपला देश कोणाला तरी आवडतो. आणि मग आपल्या देशाविषयी जास्त प्रेम असणाऱ्या मुला-मुलींशी आमची मुले मैत्री करतात.
शाळेच्या बाहेर सुद्धा त्यांची मैत्री अबाधित आहे. हे विश्वची माङो घर याचा अनुभव मुले घेत आहेत. हीच मुले जगाचे भावी नागरिक आहेत, यांच्यातच जर एकमेकांविषयी बंधुत्वाचे नाते निर्माण झाले तर जागतिक ऐक्याच्या दृष्टीने ते चांगलेच आहे.रंग, भाषा, राहणीमान याहीपेक्षा एक माणूस म्हणून एकमेकांच्या व्यक्तिमत्वाचा आदर करायला लागली आहेत.
तुम्हांला ही आवडतील न असे मित्र?