फेसबुकवर शाळेचा वर्ग कधी  भरेल  का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 05:26 PM2020-05-21T17:26:05+5:302020-05-21T17:27:23+5:30

onlineशाळा म्हणजे असतं तरी काय?

online education- social media use for teaching. | फेसबुकवर शाळेचा वर्ग कधी  भरेल  का ?

फेसबुकवर शाळेचा वर्ग कधी  भरेल  का ?

Next
ठळक मुद्दे शाळा खरंच ‘ऑनलाईन’ असू शकते का?

रणजितसिंह डेसले 

आज आपण ऑनलाईन शाळेच्या आणखी एका पद्धतीबद्दल जाणून घेवूयात. यापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ंऐप च्या मदतीने कशा पद्धतीने शाळा भरते, हे  आपण पाहिले.  त्यातला अजून एक प्रकार म्हणजे सोशल मिडियावरून काही शिक्षक त्यांचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने भरवतात. यासाठी ते यु ट्यूब लाइव्ह, किंवा फेसबुक चा वापर करत असतात. 
अशा शिक्षकांच्या वर्गात जगातील कोणताही विद्यार्थी सहभागी होवू शकतो. असे शिक्षक त्यांच्या वर्गाचे वेळापत्रक त्यांच्या सोशल मिडिया खात्यावरून अगोदरच जाहीर करतात. तुम्ही अशा शिक्षकांचे प्रोफाईल पाहून ते कोणकोणते विषय शिकवतात? कोणत्या वर्गाला शिकवतात, हीे माहिती करून घ्यायची. त्यांनी अगोदर शिकवलेल्या पाठांचे काही व्हिडिओ तिथे अपलोड केलेले असतात, ते पाहून जर तुम्हांला त्याची पद्धत आवडली तर मग तुम्ही त्यांच्या ऑनलाईन वर्गात प्रवेश घेवू शकता.  

या पद्धतीचा एक फायदा असा कि अशा शिक्षकांनी शिकवलेल्या घटकाचे व्हिडिओ तुम्ही वारंवार पाहून तो घटक समजून घेवू शकता. 
जसं  आपण आपल्या मोबाईलवर एखादा चित्रपट कसा वारंवार पाहतो, तसचं हे पाहता येत. 
पण मुलांनो, यामध्ये एक उणीव आहे. ती म्हणजे इथ शिक्षक आणि विद्यार्थी यांचा थेट संबंध येत नाही. इथल्या शिक्षकांना हे माहिती नसतं कि ते कोणत्या मुलांना शिकवत आहेत. साधारणपणो आपल्या वर्गातील मुलांची समज लक्षात घेवून आपले शिक्षक आपल्याला शिकवत असतात. इथे मात्र तसं घडत नाही.


आणि दुसरं म्हणजे इथे तुमच्या प्रश्नांना उत्तरे मिळायला तुम्हाला खूप वेळ लागतो,
 आता तुम्ही ठरवायचं कि कोणत्या प्रकारची ऑनलाईन शाळा तुम्हांला आवडेल.  
 

Web Title: online education- social media use for teaching.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.