online education - शिक्षकांनी काय करावं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 04:59 PM2020-06-17T16:59:11+5:302020-06-17T17:00:38+5:30

‘व्हर्चुअल वर्ग’ चालवण्यासाठीचे उपलब्ध मार्ग आवश्यक कौशल्यं, करून पाहाता येतील असे प्रयोग

online education - What should teachers do? | online education - शिक्षकांनी काय करावं?

online education - शिक्षकांनी काय करावं?

Next
ठळक मुद्देमुले ह्या प्रक्रियेत मनापासून सहभागी व्हावीत ह्यासाठी काय करावे लागेल? 

- अंजली चिपलकट्टी, समीर शिपूरकर

कोरोनाच्या संसर्ग-भयाने सगळ्या सामाजिक व्यवस्था हादरल्या आहेत आणि पूर्वी कधीही कल्पना केली नाही अशा नव्या वास्तवाला आपल्याला भिडावं लागत आहे. मुलांच्या सुरक्षिततेच्या चिंतेमुळे शाळा, कॉलेज किंवा कोणत्याही शिक्षणसंस्था इतक्यात सुरु करण्याचा धोका पत्करणं अशक्य आहे. त्यामुळे  शाळा पुन्हा पूर्वीच्याच पद्धतीने कधी सुरु होऊ शकतील ह्याचा अंदाज ह्या क्षणी कुणालाच देता येणं शक्य नाही. 
ह्या अभूतपूर्व परिस्थितीत महाराष्ट्र शासनाने मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विविध मार्गांनी शैक्षणिक प्रक्रिया सुरु करण्याचा प्रय} चालवला आहे. खाजगी आणि सरकारी शाळा, डिजिटल साधने व इंटरनेट वापरून ऑनलाईन पद्धतीने शिक्षणप्रक्रिया सुरु करण्याची तयारी करत आहेत. निमशहरी आणि ग्रामीण भागातील जिल्हापरिषदेच्या शाळांसमोरचे आव्हान  इतरांपेक्षा मोठे आहे. ऑनलाईन पद्धतीचे फायदे-तोटे-मर्यादा ह्याविषयी एकीकडे चर्चा चालू असतानाच अंमलबजावणीमधे येणारे अडथळेही समोर येत आहेत. स्मार्टफोन, लॅपटॉप सर्वांकडे आहेतच असे नाही. इंटरनेट उपलब्धता, वीज पुरवठा नसणो, हे तंत्रज्ञान विकत घेण्याची क्षमता नसणो अशा गंभीर अडचणी आहेत.  शहरी आणि ग्रामीण भागात राहणारे अनेक शिक्षक-पालक ह्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी प्रय}शील दिसतात. ही आपत्कालीन परिस्थिती आहे हे लक्षात घेता ह्या शिक्षक व पालकांशी संवाद साधून त्यांना मदतशील ठरू शकतील असे काही उपाय सुचवण्याचा आमचा प्रय} आहे. 
ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा पुरस्कार करणो किंवा ती कायमस्वरूपी वापरावी असा आग्रह धरणो हा ह्या मालिकेचा उद्देश नसून ह्या कठीण प्रसंगी शिक्षण प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी हातभार लावणो हा मूळ हेतू आहे. 
शैक्षणिक प्रक्रियेत सहभागी असणारे तीन घटक म्हणजे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक. ऑनलाईन शिक्षणाच्या ह्या कल्पनेने शिक्षकांसमोर अनेक प्रश्न उभे आहेत. ऑनलाईन शिक्षण म्हणजे नेमके काय अभिप्रेत आहे? ते साध्य करण्यासाठी कोणती साधने लागणार आहेत? स्मार्टफोन वापरून काम करता येईल की लॅपटॉप किंवा डेस्कटॉपची आवश्यकता आहे? मोबाईल नवा विकत घेणो आवश्यक आहे का? कोणती ?प डाउनलोड करावी लागतील? इंटरनेटचा पूर्णवेळ वापर अपेक्षित आहे का? जिथे इंटरनेट सलग-सुरळीत उपलब्ध नाही अशा ठिकाणी काय करता येईल? हे प्रश्न तर आहेतच शिवाय पेडागॉजी संबंधीही अनेक प्रश्न आहेत.  
अशी ऑनलाइन शाळा किती वेळासाठी असावी?
मुलांना शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रियपणो सामील करून घेण्यासाठी काय प्रय} करावे लागतील?


पालकांचा सहभाग वाढवता येईल का? तो   नेहमीपेक्षा काय प्रकारे वेगळा असला तर मुलांपयर्ंत शिकवण अधिक परिणामकारक पोचेल?
नेहेमी शाळेत शिकवताना शिक्षक व मुले समोरासमोर असतात. आता मात्र सगळे एकमेकांना दिसतीलच असे नाही. मग अभ्यासक्रमातले मुद्दे मुलांपयर्ंत पोचवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी लागेल? मुले ह्या प्रक्रियेत मनापासून सहभागी व्हावीत ह्यासाठी काय करावे लागेल? 
- ह्या प्रकारच्या अनेक प्रश्नांना शिक्षकांना सामोरे जावे लागणार आहे. 
वेगवेगळ्या ठिकाणी असणा?्या शिक्षकांना भेडसावणारे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे असणार आहेत. आपल्या ह्या सदरातून प्रत्येक महत्वाच्या मुद्यांना जरूर हाताळले जाईल. पण स्थानिक परिस्थितीनुसार प्रश्नांचे स्वरूप बदलेल त्यासाठी शिक्षक पालक ह्यांना जागरूकपणो ह्याविषयी वेगवेगळे मार्ग चोखाळून उत्तरे शोधावी लागतील.

 
 

 

Web Title: online education - What should teachers do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.