कबुतराला कॉपी करून करा हा व्यायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 01:02 PM2020-06-13T13:02:44+5:302020-06-13T13:04:29+5:30

पिजन लंज.

pigeon lung exercise at home | कबुतराला कॉपी करून करा हा व्यायाम

कबुतराला कॉपी करून करा हा व्यायाम

Next
ठळक मुद्देया पद्धतीनं थोडं जास्त वेळ बसण्याचा सराव केल्यास बरीच दुखणी कमी होतील.

कबुतर हा आपल्या सर्वाच्या अतिशय परिचयाचा पक्षी. अनेक ठिकाणी आपल्याला तो दिसतो. या पक्ष्याला अनेक जण पाळतातही.पण ब:याचदा या पक्ष्यांचे पंख कापलेले असतात. पूर्ण नाही, पण काही प्रमाणात. त्यामुळे त्यांना फार लांब उडून जाता येत नाही. पण असं करू नये. पक्ष्यांना पिंज:यात कोंडून ठेवणं, त्यांचे पंख कापणं. हे अतिशय क्रूरपणाचं आहे. 
कबुतरांना वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. कोणी त्यांना कबुतर म्हणतं, कोणी त्यांना पारवा, तर कोणी होला. उष्ण प्रदेशांत हे पक्षी सामान्यत: जास्त प्रमाणात आढळून येतात.  त्यांचा गुटुरगुंùù गुटुरगुंùù असा  खर्जातून काढलेला आवाज आपल्याला नेहेमीच आकर्षून घेतो. 
याच पक्ष्याचा व्यायाम आज आपल्याला करून पाहायचा आहे. वेगवेगळ्या तीन-चार पद्धतीनं हा व्यायाम करता येतो. त्यातील सोपी पद्धत आज आपण बघणार आहोत. म्हणायला सोपी असली, तरी ती तितकीशी सोपी नाही, हेही लक्षात घ्या.
योगाच्या आसनांतही यांचा समावेश केलेला असतो.
आपल्या आजच्या या व्यायामाचं नाव आहे, ‘पिजन लंज’.


कसा कराल हा व्यायाम?
1- आधी खाली नीट बसून घ्या.
2- आता आपला उजवा गुडघा जमिनीवर वाकलेल्या स्थितीत ठेवा.
3- डावा पाय सरळ मागच्या बाजूला जाऊ द्या.
4- दोन्ही हात जमिनीवर अलगद टेकवा आणि जितकं मागे वाकता येईल तितकं वाका. त्यामुळे तुमच्या पाठीला बाक येईल.
5- दोन सेकंद त्या स्थितीत थांबून आता पुढच्या बाजूला झुका आणि आपलं डोकं पुढे जमिनीवर टेकवण्याचा प्रय} करा. त्या स्थितीत पुन्हा पाच सेकंद थांबा.
6- दोन्ही पायांची स्थिती बदलून म्हणजे अगोदर उजव्या आणि डाव्या पायाची जी स्थिती होती, तीच बदलून अनुक्रमे डाव्या आणि उजव्या पायांची करा.
यामुळे काय होईल?
1-  मांडय़ांच्या स्नायूला चांगला ताण मिळेल.
2- पाठीचा व्यायाम होईल.
3- लवचिकता वाढेल.
4- आपल्या शरीराच्या अनेक अवयवांचं चांगल्या पद्धतीनं स्ट्रेचिंग होईल.
5- या पद्धतीनं थोडं जास्त वेळ बसण्याचा सराव केल्यास बरीच दुखणी कमी होतील.

- तुमचीच गुटुरगुंùù’,ऊर्जा

Web Title: pigeon lung exercise at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.