पॉईंटर डॉग ,असा व्यायाम असतो का कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:58 AM2020-06-12T11:58:02+5:302020-06-12T11:59:09+5:30
कुत्र्याचा आदर्श घेऊन एक भारी व्यायाम : पॉईंटर डॉग
तुमच्यापैकी कोणी कोणी घरी कुत्र पाळला आहे? किती मजा येते ना, कुत्र्यांबरोबर खेळताना, त्यांच्याशी गप्पा मारताना. त्यांना एकेक गोष्टी शिकवताना. त्यांच्याबरोबर शेकहॅँड करताना, त्यांना बॉल आणायला सांगताना आणि त्यांच्याबरोबर फिरायला जाताना, व्यायाम करताना!
कुत्र्याचं पिलू जेव्हा जन्माला येतं, तेव्हा त्याला दिसतही नाही आणि ऐकूही येत नाही, पण काही दिवसांतच त्याचे कान आणि नाक अतिशय तीक्ष्ण होतात.
जो आवाज माणसाला सहा मीटर अंतरावरुनही ऐकायला येत नाही, तोच आवाज कुत्र 24 मीटर अंतरावरुनही ऐकू शकतो. त्या आवाजाला प्रतिसाद म्हणून कुत्रे आपल्याला ब:याचदा भुंकताना दिसतात.
आणि कुत्र्यांचं नाक किती तीक्ष्ण असतं तुम्हाला माहीत आहे, नुसत्या वासावरुन जमिनीखाली तब्बल सहा मीटर खोल पुरलेल्या प्रेताचाही छडा तो लावू शकतो. पोलिसांचाही कुत्र जानी दोस्त असतो तो यामुळेच.
आज अशाच या इमानी कुत्र्याचा व्यायाम आपण शिकणार आहोत, या व्यायामाचं नाव आहे, ‘पॉइंटर डॉग’ किंवा ‘बर्ड डॉग’.
कसा कराल हा व्यायाम?
1- गुडघ्यांवर बसा.
2- दोन्ही हात खाली जमिनीवर टेकवा.
3- सुरवातीला आपला उजवा हात उचला आणि त्याचवेळी विरुद्ध म्हणजे डावा पाय वर उचला.
4- हात आणि पाय जमिनीला समांतर असले पाहिजे आणि हातापायांची बोटं एखाद्या गोष्टीकडे निर्देश करताना असतात तशी.
5- आता हीच कृती डावा हात आणि उजव्या पायानं करा.
6- आपल्या क्षमतेनुसार प्रत्येकवेळी दहा-पंधरा सेकंद थांबा आणि नंतर पुन्हा ही कृती आलटून पालटून रिपिट करा.
यामुळे काय होईल?
1- कोअर एक्सरसाइजसाठी हा व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे.
2- लोअर बॅक यामुळे मजबूत होईल.
3- पोटाचे स्नायू बळकट होतील.
4- ग्लूट मसल्सची ताकद वाढेल.
5- मांडय़ांमध्ये शक्ती येईल.
करून पाहा, तुमच्या या दोस्ताचा व्यायाम. फार मजा येईल.