शाळेतल्या महत्वाच्या डेटाला वाटा फुटण्याच्या शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 05:02 PM2020-07-11T17:02:46+5:302020-07-11T17:04:54+5:30

सायबर जगात  मुलं - तज्ञ् काय  म्हणतात ? भाग ४

Possibility of important school data leak.. | शाळेतल्या महत्वाच्या डेटाला वाटा फुटण्याच्या शक्यता

शाळेतल्या महत्वाच्या डेटाला वाटा फुटण्याच्या शक्यता

Next
ठळक मुद्देशाळा आणि सायबर हल्ले त्याबाबत जागरुकता आवश्यक आहे.

ऍड.  वैशाली भागवत,  प्रसिद्ध सायबर लॉ तज्ञ 
 आजच्या भागात आपण शाळांनी सायबर सेफ्टी आणि सायबर हायजिनचा विचार कसा करायला पाहिजे हे समजून घेऊया. कोविड 19 महामारीमुळे बहुतेक शाळा सध्या ऑनलाईन सुरु आहेत. व्हचरुअल क्लासरूम्सचा मोठ्याप्रमाणावर वापर सुरु आहे. बहुतेक सगळ्या शाळांकडे  विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक, इंटलेुअल प्रॉपर्टी, आर्थिक व्यवहार असा प्रचंड डाटा असतो.  हा सगळाच डाटा अतिशय संवेदनशील, गुप्त आणि खासगी असतो. त्यामुळे कुठल्याही सिक्युरिटीच्या तडजोडीमुळे हा डाटा बाहेर आला असं होऊन चालणार नसतं. सध्याच्या अतिशय अपवादात्मक परिस्थितीचा सायबर गुन्हेगारही फायदा करून घेत असल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसात वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवरचे सायबर हल्ले वाढलेले आहेत. शाळांसाठी आणखीन एक आव्हान आहे कारण शाळेतली सगळीच मुलं ऑनलाईन आहेत. ऑनलाईन शाळेसाठी ते त्यांचे वैयक्तिक मेल आयडीज वापरत आहेत. वर्गपाठ, गृहपाठ, उपक्रम यांच्यासाठी इतर ऑनलाईन टूल्स आणि माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यामुळे शाळा आणि संस्थांनी त्यांची डिजिटल माहिती जपणं आता अतिशय आवश्यक आहे. 
ऑनलाईन वावरचे तीन प्रमुख आधार स्तंभ असतात. 
1) माणसे 2) प्रक्रिया (प्रोसेसेस) आणि  3) तंत्रज्ञान
या तीन घटकांचा स्वतंत्र आणि बारकाईने विचार करणो आवश्यक असते. कसा ते पाहूया.
शाळा, मुलं आणि शिक्षक ऑनलाईन जाण्यापूर्वी या गोष्टींचा विचार गांभीर्याने  केला गेला पाहिजे.

कशाकशाची काळजी घ्याल?
1) माणसे: यात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व्हेंडर्स किंवा असे सगळे लोक जे शाळेच्या नेटवर्कचा, ईमेलचा वापर करतात. किंवा अनेकदा कॉमन ईमेल आणि पासवर्डचा वापर करतात.   
2) प्रक्रिया (प्रोसेस): यात शाळेमध्ये सुरक्षित संगणक सुविधा असायला हव्यात. इतर ?प्लिकेशन्स जसं की झूम, गुगल मीट यांच्या वापराबाबत जागरूकता हवी. 
3) तंत्रज्ञान: व्हॉट्स अप, ईमेल्स, सोशल मीडिया वापराबाबतही गांभीर्याने विचार केलेला हवा. काय आणि कसे वापरणार आहोत याबद्दल नियमावली आवश्यक आहे. 
याखेरीज, 
1) माहित नसलेल्या ईमेल्सवर क्लिक न करणं, 
2) अनोळखी मेल्स आणि मेसेजेस फॉरवर्ड न करणं
3) कुठल्याही ऑफर्सच्या मेल्सवर क्लिक करून त्या न उघडणं यासारख्या काही मूलभूत गोष्टी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना माहित असायला हव्यात आणि त्यावर काटेकोर अंमलबजावणी हवी. 
4) शाळेच्या गरजेनुसार आवश्यक ती संगणक आणि संगणक सुरक्षा यंत्रणा शाळेत असणं आवश्यक आहे. 
5) सायबर सिक्युरिटी आणि प्रायव्हसी म्हणजेच सायबर सुरक्षा आणि वैयक्तिक गुप्तता या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. एकमेकांना पूरक आहेत. 

(शब्दांकन: मुक्ता चैतन्य )
 

Web Title: Possibility of important school data leak..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.