स्क्रॅच आणि पायथॉन - लॉकडाऊनमध्ये मुलं काय शिकली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 12:59 PM2020-06-03T12:59:55+5:302020-06-03T13:00:41+5:30

पुण्यातल्या मुलांनी केलेल्या एका भन्नाट प्रयोगाची गोष्ट

Scratch and Python - What did the kids learn in Lockdown? | स्क्रॅच आणि पायथॉन - लॉकडाऊनमध्ये मुलं काय शिकली?

स्क्रॅच आणि पायथॉन - लॉकडाऊनमध्ये मुलं काय शिकली?

Next
ठळक मुद्देमुलांनी स्क्रॅच ही कॉम्युटर सॉफटवेअरची बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज स्वत:हुन शिकायला सुरुवात केली.

- चेतन एरंडे

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून मुलांना सक्तीने घरातच बसण्याची वेळ आली. पुण्यात आम्हा आई-बाबांचा असा एक खास गट आहे. आम्ही सगळे मिळून मुलांबरोबर सतत वेगवेगळे प्रयोग करत असतो. आम्ही ठरवलं, की लॉकडाऊनमुळे शाळा लवकर बंद झाल्या आहेत, तर या संकटातून संधी शोधूया आणि आपल्या मुलांनी त्यांचा वेळ कसा घालवावा, हे त्यांचं त्यांनाच ठरवू देऊया. मुलांना म्हटलं, की आता तुम्हीच शोधून काढा की तुम्हाला काय करायला आवडेल ते! मार्च महिन्याच्या दुस?्या आठवड्यात मुलं ऑनलाईन एकत्र आली. काय करायचे, यांवर चर्चा झाली. शेवटी मास्क बनवून विकणो किंवा नवीन काहीतरी शिकणो असे दोन पर्याय शिल्लक राहिले. मास्क बनवणो, ते विकणो हे लॉकडाऊन मुले अशक्य असल्याने मुलांनी नवीन गोष्टी शिकण्याचा निर्णय घेतला. आपापसात चर्च करून मुलांनी स्क्रॅच ही कॉम्युटर सॉफटवेअरची बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज स्वत:हुन शिकायला सुरुवात केली. एक महिन्यात ही भाषा शिकून, त्याची माहिती देणारा एक ऑनलाईन कार्यक्रम देखील मुलांनी केला. एवढ्यावरच न थांबता मुलांनी पायथॉन ही सध्या प्रचंड मागणी असलेली प्रोग्रामिंगची भाषा थेट मायक्रोसॉफ्टच्या मदतीने स्वत:हुन शिकायला सुरुवात केली. - हे सगळं करताना काय काय झालं, तेच मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा, उद्या भेटूया!

Web Title: Scratch and Python - What did the kids learn in Lockdown?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.