मुलं स्क्रॅच शिकतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 05:40 PM2020-06-03T17:40:22+5:302020-06-03T17:40:42+5:30

लॉकडाऊनमध्ये मुलं काय शिकली?

Scratch is a block-based visual programming language | मुलं स्क्रॅच शिकतात..

मुलं स्क्रॅच शिकतात..

googlenewsNext
ठळक मुद्देआपल्यापुढे येणारी अडचण आपण स्वत:हून कशी सोडवायची

-चेतन एरंडे

मुलांना आपण स्वातंत्र्य देऊन बसलोय तर खरं पण मुलं या स्वातंत्र्याचा उपयोग कसा करतील हा प्रश्न आमच्या मनात असतानाच, मुलांनी आता आम्हाला स्क्रॅच प्रोग्रामिंग यायला लागलं आहे आणि आम्ही त्यात एक स्टोरी सुद्धा तयार केली आहे, अशी गोड बातमी आम्हाला महिनाभराने दिली.
  ‘ही स्टोरी तुम्ही आम्हाला दाखवाल का?’असं मुलांना विचारल्यावर एका पायावर तयार झाली. आणि आपण आईबाबांना पालकांना जे काही सांगणार आहोत ते त्यांच्यापयर्ंत व्यवस्थित पोहोचलं पाहिजे म्हणून झपाटून कामाला लागली.
लॉकडाऊन असल्याने अर्थातच हि स्टोरी मुलं ऑनलाइनच सांगणार होती, त्यामुळे मुलांनी कुणी कोणता भाग सांगायचा? त्याला किती वेळ लागेल? याची कसून तयारी सुरु केली. जवळपास आठवडाभर तयारी केल्यानांतर मुलांनी पालकांपुढे त्यांनी स्क्रॅचमध्ये तयार केलेली गोष्ट व त्या गोष्टीसाठी त्यांनी घेतलेली मेहनत अतिशय आत्मविश्वासाने मांडली. मुलांनी प्रोग्रामिंगमधले बारकावे जसे सांगितले तसेच स्टोरी तयार करण्यासाठी त्यांनी प्रसंग त्यातील पात्र कशी निवडली आणि सॉफ्टवेअरच्या मर्यादा समजून घेऊन त्या गोष्टीत बदल कसे केले? हे पण सांगीतलं.
ही गोष्ट बघताना, मुलं फक्त प्रोग्रामिंग शिकली नाहीत तर एकमेकांशी सहकार्य कसं करायचं? आपण जी गोष्ट करायची ठरवली आहे, ती आपल्याला जमायला लागली कि नाही हे कसं ओळखायचं ? आपल्यापुढे येणारी अडचण आपण स्वत:हून कशी सोडवायची? हे सगळं शिकली आहेत.
पुढच्या भागात मुलांनी प्रोग्रामिंगमधील पुढचा टप्पा कसा गाठला हे आपण समजून घेणार आहोत.


 

Web Title: Scratch is a block-based visual programming language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.