आईबाबांच्या युट्युबपेक्षा वेगळं, तुमचं स्वत:चं असं खास काही!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 06:00 AM2020-05-28T06:00:00+5:302020-05-28T06:00:11+5:30

युट्युब किड्स

screen time - youtubekids | आईबाबांच्या युट्युबपेक्षा वेगळं, तुमचं स्वत:चं असं खास काही!!

आईबाबांच्या युट्युबपेक्षा वेगळं, तुमचं स्वत:चं असं खास काही!!

Next
ठळक मुद्देआज तुम्ही काहीतरी बघणारच, तर काय बघाल?

आईबाबांच्या युट्युबवर काही बघायचं म्हणजे तिथे बातम्या आणि  इतर गोष्टींचाच भडीमार असतो. त्यातून तुम्हा मुलांच्या आवडीचे व्हिडीओ शोधून काढणं जामच कठीण काम असतं. 
म्हणूनच आता युट्युबने युट्युबकिड्स नावाचा वेगळा प्लॅटफॉर्म सुरु केला आहे. ही वेबसाईट्स आणि याचे एप्स फक्त मुलांना डोळ्यासमोर ठेवून बनवलेले आहेत. आर्ट, क्राफ्ट, गाणी, गप्पा, गोष्टी, माहिती असं सगळं सग आहे त्यात. पालक आणि मुलांना काय आवडले याचा अभ्यास करणारे लोकं. यातही प्रत्येक वयानुसार व्हिडीओज आहेत. तुम्ही किती वेळ स्क्रीनसमोर घालवायचा हे ठरवण्यासाठी टायमर आहे. 


या सगळ्यामुळे तुम्हा मुलांना तुमच्या आवडीचे व्हिडीओ बघणं सोपंही जाऊ शकतं आणि किती वेळ तुम्ही युट्युबवर होतात हे बघून त्यानुसार आपला स्क्रीनटाईमही  आपण ठरवू शकतो. आपल्याला ऑनलाईन जायचं आहे तर वेळेच बंधनही आपण आपलं घालायला शिकलं पाहिजे. 
गुगलवर youtubekids असं सर्च केलंत की त्याच्या वेबसाईटवर तुम्हाला जाता येईल. 
तसंच ऍपल  आणि अँड्रॉइड ऍप स्टोअर्स मधूनही तुम्ही youtubekids डाउनलोड करू शकता. 

Web Title: screen time - youtubekids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.