मेमरी बॅंडा-आफ्रिकेतल्या शूर मुलीची गोष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 02:47 PM2020-04-27T14:47:08+5:302020-04-27T14:48:05+5:30
आज भेटा या आफ्रिकेतल्या शूर मैत्रिणीला
तेव्हा ती जेमतेम तेरा वर्षांची होती. आफ्रिकेत मलावी नावाच्या एका छोट्या गरीब देशात राहणारी छोटीशी मुलगी. तिथं बालविवाह व्हायचे. मलावी परंपरेनुसार मुलीला पाळी आली की तिला लगेच इनिशिएशन कॅम्प ला पाठवलं जायचं. मेमरीची बहीणही अशाच कॅम्पला गेली. या कॅम्पमध्ये या दहा-बारा वर्षाच्या मुलींना लैंगिक शिक्षण दिलं जातं असं सांगितलं जायचं. पण बालविवाहाची पद्धत असल्याने मुलींना लग्नासाठी तयार केलं जायचं असं या कॅम्पसच्या विरोधात काम करणा?्या कार्यकत्र्यांचं म्हणणं होतं. मेमरीची बहीण अकरा वर्षांची होती जेव्हा ती या कॅम्पमध्ये गेली. तिचा अनुभव चांगला नव्हता. लगेच बाराव्या वर्षी तिचं लग्न झालं. आणि पुढच्या एक दोन वर्षात मुलंही. तिची खेळकर बहीण अगदी कोमेजून गेली. घरकाम आणि मुलं यांच्यात पिचून गेली.
जे आपल्या बहिणीचं झालं तर आपलं होऊ द्यायच नाही हे मेमरीने ठरवून टाकलं. आपण कॅम्पला जायचं नाही हे तिने ठरवून टाकलं. हे ठरवलं तेव्हा ती जेमतेम 13 वर्षांची होती. लोकांनी तिला नावं ठेवली. आपल्या चालीरितींचा सन्मान करत नाही म्हणून नावं ठेवली. पण मेमरीने जे ठरवलं होतं ते ठरवलं होतं. कॅम्पमध्येही जाणार नाही आणि बालविवाहही करणार नाही. जसजशी ती मोठी व्हायला लागली तिने बालविवाह विरोधात कामाला सुरुवात केली. तिच्या प्रय}ामुळे अनेक मलावी मुले-मुली अजाणत्या वयातल्या लग्नाला विरोध करू लागली आहेत.आज मलावी गल्र्स इम्पोवार्मेंट नेटवर्क, लेट गल्र्स लीड आणि गल्र्स नॉट ब्राईडस या संस्थाबरोबर काम करते आहे. तिच्या प्रय}ांमुळे मलावी देशातील लग्नाचे वय 15 वरुन 18 झालं आई.
मेमरीला भेटायचंय?
1. मेमरीचे अनेक व्हिडीओज ऑनलाईन आहेत. युट्युब आणि टेड टॉकमध्ये आहेत. ते तुम्ही नक्की बघा.
2. त्यासाठी memory banda असं इंग्लिशमध्ये सर्च करा.