टायलर, एमिली आणि गाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:26 AM2020-06-12T11:26:36+5:302020-06-12T11:28:59+5:30

टायलरनं डिझाइन केलेला गाऊन आता इलिनॉईस राज्यातल्या सगळ्या आजारी मुलांच्या अंगावर असणार आहे.  

Tyler, Emily and Gown- boy-creates-winning-hospital-gown-design-based-words-sick | टायलर, एमिली आणि गाऊन

टायलर, एमिली आणि गाऊन

Next
ठळक मुद्देया स्पर्धेबद्दल कळताच टायलरला त्यात भाग घ्यावासा वाटला.

टायलर केपकॉस्कस नावाचा  सात वर्षाचा अमेरिकन मुलगा.  त्याची चार वर्षाची एमिली नावाची छोटी बहिण आहे. दोघं सतत एकमेकांसोबत खेळतात. त्यांना एकमेकांशिवाय अजिबात करमत नाही. 
एमिलीला हदयासंबंधीचा आजार आहे. जन्मल्यापासून आतार्पयत तिची तीन ऑपरेशन्स झाली आहेत.  प्रत्येकवेळेस एमिलीला दवाखान्यात अॅडमिट केलं की, ती परत नीट होऊन घरी येईलना याची तिच्या आई बाबांना काळजीच वाटते. पण टायलर मात्र लहान असूनही समजूतदारपणो वागतो. तो  एमिलीला दवाखान्यात जाण्याआधी तो शूर आहेस, तू बरी होशील .आमचं तुङयावर खूप प्रेम आहे असं समजावून सांगतो. टायलरला हे माहित त असतं की, आपली बहिण फायटर आहे, ती आजारावर मात करून घरी येईलच. 


एकदा टायलरच्या आईला  ‘स्टारलाइट चिल्ड्रन्स फाऊण्डेशन’च्या फेसबुक पेजवर एका स्पर्धेची माहिती मिळाली. हे फाऊण्डेशन आजारी मुलांसाठी काम करतं. दवाखान्यात उपचारांसाठी अॅडमिट होणा :या मुलांसाठी गाऊनचं डिझाईन तयार करण्याची  स्पर्धा होती.  या स्पर्धेबद्दल कळताच टायलरला त्यात भाग घ्यावासा वाटला. एमिलीमुळे त्याचंही सतत दवाखान्यात येणं जाणं असतं. त्यानं एमिलीचा विचार डोक्यात ठेवून त्यानं डिझाईन केलं.  गाऊनवर ब्रेव्ह, करेज, होप, सव्हार्यव्हर, स्ट्रेन्थ, लव, फायटर हे शब्द आणि विविध रंग  त्याच्या या गाऊनच्या डिझाइनमधे होते. दवाखान्यात असताना एमिलीनं जर हा गाऊन घातला तर हे शब्द आणि रंग बघून तिला आपली नक्की आठवण होईल, म्हणून टायलरनं तो गाऊन तसा डिझाइन केला.
 हे डिझाइन त्यानं स्टारलाइटला पाठवलं. तिथे 1000 डिझाइन आलेले होते. त्यातून टायलरच्या डिझाईनला बक्षिस मिळालं. आता जेव्हा एमिली दवाखान्यात अॅडमिट होईल तेव्हा तिच्या अंगावर आपण डिझाइन केलेला गाऊन असेल या विचारानं टायलर खूष झाला आहे. टायलरनं डिझाइन केलेला गाऊन आता इलिनॉईस राज्यातल्या सगळ्या आजारी मुलांच्या अंगावर असणार आहे.  

 



 

Web Title: Tyler, Emily and Gown- boy-creates-winning-hospital-gown-design-based-words-sick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.