शाळेचा व्हर्चुअल पासपोर्ट तयार करता येतो ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 07:10 AM2020-05-28T07:10:00+5:302020-05-28T07:10:02+5:30
onlineशाळा म्हणजे असतं तरी काय?
- रणजितसिंह डिसले, प्राथमिक शाळा, परितेवाडी
दोन वषार्पूर्वी आमच्या तालुक्यात पासपोर्ट कार्यालय सुरु झाल्याची बातमी पेपरमध्ये आली होती.
तो पेपर घेवून अश्विनीआली आणि म्हणाली, ‘सर पासपोर्ट म्हणजे काय असत?’
मी म्हटल, ‘बाहेरच्या देशांत जाताना आपल्याला आवश्यक कागदपत्रंपैकी एक!’
ती म्हणाली, ‘मग आपण तर अनेक देशांत व्हर्च्युअल जातो, आपल्याला नाही का लागत पासपोर्ट?’
मी नाही असे सांगितले. पण आपण तुम्हां सर्वांचे पासपोर्ट काढूयात असे सांगितले. आणि मग आम्ही आमच्या सर्व व्हच्यरुअल ट्रीप च्या नोंदी ठेवण्यासाठी खास असे पासपोर्ट प्रिंट करून घेतले. यामध्ये प्रत्येकाची वैयक्तिक माहिती तर आहेच, पण जेंव्हा आम्ही प्रदेशातील शिक्षकांशी, तिथल्या मुलांशी संवाद साधतो त्यावेळी मिळालेली माहिती या पासपोर्ट मध्ये लिहून ठेवतो.
आम्ही ज्या देशाला भेट देणार त्याचे नकाशातील स्थान मुले शोधून ठेवतात. आणि परितेवाडी ते त्या देशाची राजधानी यांचे अंतर नकाशाद्वारे मोजून त्याची नोंद पासपोर्टमध्ये करतात. त्या देशातील मुलांशी संवाद साधताना काही वाक्यांचे भाषांतर त्यात लिहिले जाते.
त्या मुलांशी संवाद साधताना जे वेगळेपण जाणवलं आणि काय आवडलं याची नोंद त्या पासपोर्ट मध्ये केली जाते. मागील दोन वर्षात काही मुलांनी एक लाख किलोमीटर एवढा व्हर्च्युअल प्रवास केलाय. काहीना 10 पेक्षा जास्त भाषेतील 2-3 शब्द माहिती झाले आहे. आपण काय शिकलो? याची नोंद करायल हवी ना!
मग आता तुम्ही पण बनवाल न तुमचा पासपोर्ट? मला नक्की सांगा तुमच्या पासपोर्ट मध्ये काय काय आहे ते