onlineशाळा म्हणजे असतं तरी काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 07:30 AM2020-05-16T07:30:00+5:302020-05-16T07:30:02+5:30

शाळेत न जाता घरी बसून ऑनलाईन शिकता येत का?

virtual-schools- online education- will it work? | onlineशाळा म्हणजे असतं तरी काय?

onlineशाळा म्हणजे असतं तरी काय?

Next
ठळक मुद्देशाळा ‘ऑनलाईन’ कशी असेल?

- रणजितसिंह डिसले  प्राथमिक शिक्षक, परीतेवाडी शाळा

मुलांनो, आता दोन महिने होऊन गेले. महाराष्ट्रातील सर्वच सरकारी शाळांना सुट्टीच आहे. एवढी मोठी सुट्टी मिळाल्याने बच्चे कंपनी खुश असायला हवी होती. पण घरात बसून सर्वांनाच कंटाळा आलाय. सुट्टी म्हटल कि टीव्ही पहायला , मोबाईल मध्ये गेम्स खेळायला अनेकांना आवडत. पण मोबाईलमधील गेम्स  तरी किती दिवस खेळणार? ते सुद्धा  आता नकोसे झाले आहेत. 
आता जून महिना सुरु होईल आणि सगळ्यांना शाळा सुरु होण्याचे वेध लागतील. पण कोरोनामुळे जून मध्ये  शाळा उघडतील का, हे मात्र सांगता येत नाहीये. काहीजण म्हणतात कि शाळा सुद्धा आता ऑनलाईन भरणार आहेत. कशी असते ही ऑनलाईन शाळा? खरंच असं शाळेत न जाता घरी बसून ऑनलाईन शिकता येत का? यासाठी माझायाकडे कोणती साधनं असावी लागतील? माङो मित्र असतील का या ऑनलाईन शाळेत? - असे खूप सारे प्रश्न तुम्हांला पडले असतील. 


- या प्रश्नांचीच उत्तरं मी आजपासून देणार आहे
तुम्ही टीव्हीवर रामायण-महाभारत बघीतलंअसेल, तर तुम्ही पाहिलं असेल की पूर्वी शाळा भरायची ती ऋषींच्या घरी किंवा आश्रमात. ज्याला शिकायचं आहे , त्याला ऋषींच्या आश्रमात रहाव लागायचं. मग नंतर चार भिंतीची वर्गखोली असणारी शाळा सुरु झाली. या शाळेत मुलंअन शिक्षक दोघेही यायचे. तुम्ही रोज जाता ना, तीच ही पारंपारिक शाळा. आता सुरु होत आहेत ऑनलाईन  शाळा. या शाळेतील मुलं घरीच बसून शिकतात. आजारी पडलो, मामाच्या गावी गेलो म्हणून ही ऑनलाईन शाळा बुडवता येत नाही. आणि कुठला अभ्यास बुडत नाही. आहे ना गंमत!!

 

Web Title: virtual-schools- online education- will it work?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.