हे वर्क फ्रॉम होम -ऑनलाइन मीटिंग काय असतं ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 06:50 AM2020-04-20T06:50:00+5:302020-04-20T06:50:02+5:30
हल्ली रोज आईला नाहीतर बाबाला ऑनलाईन मिटिंग अटेंड करायची असते, हे कसं करतात?
वर्क फ्रॉम होम कळलं पण ऑनलाईन मिटींग्स कशा घेतात?
अनघा कित्तुरे, लातूर
ऑनलाईन मिटिंग दोन प्रकारे घेतल्या जातात. एक म्हणजे फक्त ऑडिओ. ज्यात एकाच वेळी अनेक जण एकमेकांशी बोलत असतात, एकमेकांना ऐकत असतात. यात ते एकमेकांना दिसत नाहीत. दुसरा प्रकार म्हणजे व्हिडीओ. यात एकाचवेळी अनेक जण ऑनलाईन येतात आणि एकमेकांशी बोलतात. या प्रकारच्या मिटिंग्जमध्ये सगळे सगळ्यांना दिसतात, त्यांचे आवाज ही ऐकू येतात.
तुम्हाला सगळ्यांना व्हॉट्स अप तर माहीतच आहे. व्हॉट्स अप वरून हे दोन्ही प्रकार करता येतात. फक्त व्हॉट्स अप ची मर्यादा सध्यातरी 4 माणसांची आहे. म्हणजे 5 लोकांना एकाच वेळी ऑनलाईन मिटिंग करायची असेल तर करता येत नाही.
पण गुगल डुओ, झूम, स्काईप अशा अजूनही अनेक वेबसाइट्स आणि अँप्स आहेत ज्यांच्या माध्यमातून एकाच वेळी अनेक जण ऑनलाईन मिटिंग करू शकतात.
यात होतं काय कि एक वेळ ठरवली जाते. या वेळेला सगळ्यांनी ऑनलाईन यायचं. मग त्यातला कुणीतरी एक जण बाकी सगळ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये ?ड करतो आणि आपल्या फोनच्या किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनवर सगळेच एकाच वेळी वेगवेगळ्या छोट्या छोट्या चौकटीत दिसायला लागतात. काहीवेळा प्रत्येकासाठी वेगळा आयडी क्रिएट होतो. म्हणजे तुमच्या फोन नंबर ऐवजी वेगळा आयडी असतो तो वापरून अशा मीटिंगमध्ये सहभागी होता येतं. आता सगळेच घरात आहेत, पण कामे अडून चालणार नाही, त्यामुळे बहुतेक ऑफिसेसमधून अशा पद्धतीने मिटींग्स केल्या जातात. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देखील सध्या अशाच व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून त्यांच्या मिटींग्स करत आहेत.