मुलं ऑनलाईन असतात, तेव्हा अभ्यासाखेरीज आणखी कायकाय होऊ शकतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 05:16 PM2020-07-11T17:16:00+5:302020-07-11T17:21:51+5:30

सायबर जगात  मुलं - तज्ञ् काय  म्हणतात ? भाग ५

When kids are online, what else can happen besides studying? | मुलं ऑनलाईन असतात, तेव्हा अभ्यासाखेरीज आणखी कायकाय होऊ शकतं?

मुलं ऑनलाईन असतात, तेव्हा अभ्यासाखेरीज आणखी कायकाय होऊ शकतं?

Next
ठळक मुद्दे..याचा अंदाज पालकांना असायला हवा!!

ऍड.  वैशाली भागवत,  प्रसिद्ध सायबर लॉ तज्ञ 

घरातून मुलं जेव्हा ऑनलाईन जातात तेव्हा ती प्रामुख्याने स्मार्ट फोन्स, टॅब्स वापरतात. आणि घरात वायफाय असल्याने तुफान स्पीडचं इंटरनेट मुलांना उपलब्ध असतं. सर्वसाधारणपणो मुलं कशासाठी ऑनलाईन जातात तर युट्युब, म्युङिाक व्हिडीओ, गेम्स, सोशल मीडिया.
मल्टी प्लेअर गेम्सच्या माध्यमातून मुलांना लक्ष करणारे गुन्हेगार, पेडोफिलिया ग्रस्त व्यक्ती (म्हणजे अशी मोठी माणसे ज्यांना लहान मुलांविषयी तीव्र लैंगिक आकर्षण असतं आणि अनेकदा त्यातून मुलांसोबतचे लैंगिक गुन्हे घडतात.) सहजरित्या मुलांपयर्ंत पोचू शकतात. बहुतेकदा असे गुन्हेगार मुलांचा विश्वास संपादन करून मग त्यांना लक्ष करतात. यातही लैंगिक छळासाठी मुलांचा वापर करणायार्ची संख्या मोठी असते.
काही केसेस इथे जरूर सांगेन.
केस 1 - अ ला ऑनलाईन एक व्यक्ती भेटते, अ चा त्या व्यक्तीवर विश्वास बसतो, इतका की स्वत:चे काही नग्न फोटो ती व्यक्ती अ ला पाठवायला सांगते. आणि अ मोठ्या विश्वासाने फोटो शेअर करतो. आणि मग पुढे जाऊन ती व्यक्ती अ ला ब्लॅकमेल करायला सुरुवात करते. सोशल मीडियावर आणि इंटरनेट वर फोटो व्हायरल करण्याच्या धमक्या द्यायला लागते.
केस 2 : एक लहान मुल डेटिंग एप्स ला सबस्क्राईब करतं. जिथे मित्र किंवा एस्कॉर्ट्स भाड्याने मिळतील असं म्हटलेलं असतं. ते मुल एक डेट बुक करतं पण नंतर घाबरून डेट आणि सबस्क्रिप्शन रद्द करतं. त्याबरोबर ते एप्स त्या मुलाकडून अधिक पैसे मागायला लागतं आणि पैसे दिले नाहीत तर प्रोफाईलची सगळी माहिती सायबर पोलिसांकडे देऊ अशी धमकी द्यायला लागतं.

या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत. त्यामुळे मुलांशी ऑनलाईन वावराबद्दल स्वतंत्र संवादाची आज गरज आहे. बहुतेक पालकांचा असा समज असतो की आपलं मुलं काहीही चुकीचं करणार नाही किंवा प्रश्न पडले तर आपल्याला विचारायला येईलच. पण अनेकदा असं होत नाही. मी अनेक केसेस मध्ये हे बघितलं आहे की मुलं आणि पालक यांच्यात सायबर स्पेसबद्दल पुरेसा संवाद नसतो. अनेकदा पालकांनाच पुरेशी माहिती नसते, ती करून घ्यायला हवी ही जागरूकता नसते. आणि मला वेळ नाहीये हे कारण पुढे करण्याची अनेक पालकांची मानसिकता या सगळ्यामुळे आपण कुठेतरी आपल्या मुलांनाच धोक्यात आणत असतो.

आपलं मूल सायबर स्पेसमध्ये वावरताना कुठल्या अडचणीत नाहीये ना हे बघणं ही देखील पालकांची च जबाबदारी आहे. सायबर स्पेसमध्ये धोके कशामुळे निर्माण होतात हे समजून घेणं आवश्यक आहे. त्याविषयी बघूया पुढच्या भागात.


(शब्दांकन: मुक्ता चैतन्य )

Web Title: When kids are online, what else can happen besides studying?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.