kill कंटाळा ! - माझ्या घरी सिम्बा आहे , कंटाळा येईल कसा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 05:12 PM2020-03-27T17:12:22+5:302020-03-27T17:12:32+5:30
कंटाळा टाळायचा म्हणून तुम्ही काय काय करताय कळवा ऊर्जाला !
- रमा माळी
कंटाळा यायला आता मला वेळच नाहीये ना! कोरोना आउटब्रेकमुळे आमची शाळा बंद केली आहे. सुरुवातीला मला खूप कंटाळा आला घरात, कारण काहीच करायला नव्हतं. खूप बोअर व्हायचं. सध्याच्या वातावरणामुळे मी अजिबात म्हणजे अजिब्बातच थ्रिल्ड नाहीये; पण तरीही आता घरीच आहे. त्यामुळे माझा वेळ छान जावा यासाठी मी काही फन अॅक्टिव्हिटिजपण करतेय. माङयाकडे सिम्बा म्हणून पेट कुत्र आहे. बीगल जातीचा हा आमचा सिम्बा खूपच धमाल आहे. अजून तो खूपच छोटा आहे; पण त्याच्याशी मी घरात आणि बाल्कनीमध्ये खेळते. त्याच्याशी खेळण्यात माझा मस्त वेळ जातोय. मी खूप पुस्तकंही वाचते. मला हॅरी पॉटर, डायरी ऑफ अ व्हिम्पी किड, पर्सी जॅक्सन ही पुस्तकं आवडतात. त्यांचे सगळे भाग माङयाकडे आहेत. तेही मी वाचते. शिवाय दुपारी क्राफ्ट प्रॉजेक्ट करते. ज्यात मी माङयासाठी एक पेन स्टॅण्ड बनवला आहे. आणि माझं स्वत:चं प्लॅनरही तयार केलं आहे. मला चित्र काढायलाही खूप आवडतात, तेही मी करते. शिवाय अभ्यासही करते अधूनमधून.
आणि हो, मी टीव्हीपण बघते. मला नेटफ्लिक्स आणि यू-टय़ूबवरचे मुलांसाठीचे कार्यक्रम बघायला आवडतात.
कंटाळा टाळायचा म्हणून तुम्ही काय काय करताय कळवा ऊर्जाला !
urja@lokmat.com
अभिनव इंग्लिश मीडिअम प्रायमरी स्कूल, पुणो