लॉकडाउन मध्ये घरचे सगळे चिडचिड का करतात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 08:00 AM2020-05-06T08:00:00+5:302020-05-06T08:00:07+5:30
मला खूप कंटाळा आलाय आता घरात बसून. कधी संपणार हे सगळं?
आता लॉक डाऊन आणखी वाढलाय. मला खूप कंटाळा येतो घरात. आईबाबाही अधून मधून एकमेकांवर चिडचिड करतात. त्यांनाही कंटाळा येत असेलच. मलाही खूप भांडावंसं वाटतं असं का होत असेल? - अनिता शिरमळकर, मुंबई
अनिता आपली सगळ्यांची आता मोठी परीक्षा आहे बरंका ! बघ म्हणजे तुलाच काय कुणालाच असं सतत, 24/7 घरात बसायची सवय नाहीये. आईबाबा ऑफिसला जातात, तू शाळेत, क्लासेसना.आपण सगळेच आपल्या रुटीनमध्ये बिझी असतो, पण आता एकदम सगळ्यांचीच रुटीन्स बंद झाली आहेत आणि सगळेच घरात अडकले आहेत. त्यामुळे आता पुढचे सगळे लॉकडाऊनचे दिवस झाल्यावर कंटाळा येणं स्वाभाविक आहे. परिस्थितीच अशी आली आहे कि सगळ्यांचीच थोडी थोडी चिडचिड होतेय. पण विश्वास ठेव हाही काळ निघून जाईल. आपण घरात थांबलो तर कोरोना विषाणूला य युद्धात नक्की हरवू.
आता आलेल्या कंटाळ्याचं करायचं काय?
1. तुला चित्र काढून, पुस्तकं वाचून कंटाळा आला असेल तर थोडे दिवस हे काहीच करू नकोस.
2. वेगळं काहीतरी कर. गाणी ऐक, युट्युबवर भाषा, नाच शिक. कुकिंग शिक.
3. मग याचाही कंटाळा आला कि परत चित्र काढ. किंवा एखाद दिवशी काहीच न करता मस्त झोपा काढ.
4. आपण सतत घरात आहोत, बाहेर जाता येत नाही या विचारानेही दमायला होतं. अगदी आईबाबांना सुद्धा.
5. मग अशावेळी आपल्याला ज्या गोष्टींचा कंटाळा आलाय, त्या न करता काहीतरी वेगळंच करायचं. म्हणजे मग कंटाळा दूर पळून जातो. कारण कंटाळ्याला पळवून लावण्या व्यक्तिरिक्त आता तरी आपल्याकडे दुसरा काहीच उपाय नाहीये.
6. घराबाहेर तर पडता येणार नाही, मग उगाच एकमेकांच्या अंगावर चिडचिड करण्यापेक्षा तू एक काम कर, आईबाबांना ही बरोबर घे आणि तुम्ही सगळे मिळून या कंटाळ्याला कसं पळवून लावता येईल याच्या युक्ती शोधा.
7.मला खात्री आहे तुम्ही सगळे एकत्र आलात कि तुम्हाला युक्ती सापडेल आणि तुमचा वेळ नक्की छान जाईल आणि चिडचिड कमी होईल.
अनिताचा हा प्रश्न वाचणाऱ्या सगळ्या मित्र मैत्रिणींनीही आईबाबांना एकत्र घेऊन टीम करा आणि कंटाळ्याला पळवून लावा. त्यासाठी तुम्ही काय काय युक्ती केलीत ते उर्जाला नक्की कळवा.
.