मोठ्यांसाठीच्या  बातम्या  मुलांनी  का  पाहायच्या ? - नो वे ! तुम्ही  हे  पहा, मुलांच्या  बातम्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 04:40 PM2020-03-27T16:40:52+5:302020-03-27T16:43:34+5:30

मुलांसाठी बातम्या असं काही असतं हे माहिती नव्हतं ना?

Why should kids watch Adults news? watch kids news | मोठ्यांसाठीच्या  बातम्या  मुलांनी  का  पाहायच्या ? - नो वे ! तुम्ही  हे  पहा, मुलांच्या  बातम्या 

मोठ्यांसाठीच्या  बातम्या  मुलांनी  का  पाहायच्या ? - नो वे ! तुम्ही  हे  पहा, मुलांच्या  बातम्या 

Next
ठळक मुद्दे मुलांच्या न्यूज साइट्स कुठे पाहायच्या? 

तुमचा स्क्रीन टाइम किती आहे?  आता तुम्हाला प्रश्न पडेल, की स्क्रीन टाइम म्हणजे काय? तर, तुम्ही दिवसभर जेवढा वेळ स्क्रीनसमोर असता त्याला म्हणतात स्क्रीन टाइम. यात तुमचा टीव्ही, टॅब, मोबाइल सगळं सगळं आलं! म्हणजे दिवसभरात तुम्ही किती वेळ टीव्ही बघता, किती वेळा स्वत:चा किंवा आई-बाबांचा, आजी-आबांचा मोबाइल वापरता, टॅब वापरता तो सगळा वेळ एकत्र करायचा की झाला तुमचा स्क्रीन टाइम.

तर हा स्क्रीन टाइम आई-बाबा ठरवून देतील तेवढाच वापरायचा. त्यासाठी हट्ट आणि भांडणं करायची नाहीत आई-बाबांशी.

तर आपण वृत्तपत्रंबद्दल बोलत होतो. तुम्ही आता इंटरेस्टिंग बातम्या ऑनलाइनही वाचू शकता. खास मुलांसाठी असलेल्या वेब साइट्सवरून. ते मोठय़ांचं राजकारण, त्यातली भांडणं, वादावादी जाऊ देत. जगात त्यापेक्षा खूप छान छान गोष्टी घडत असतात ज्या वाचायला तुम्हाला खूप मजा येऊ शकते. शिवाय त्यातून नवी माहितीही मिळू शकते. यावर विज्ञान, तंत्रज्ञान, आर्ट, क्राफ्ट आणि मुलांना ज्या ज्या विषयात वाचायला आवडेल असं बरंच काही असतं. अशाच खास मुलांसाठी असलेल्या दोन साइट्सची नावं आणि पत्ते देतेय, शिवाय गुगलवर न्यूज फॉर किड्स असा सर्च केलात तर अजूनही साइट्स सापडतील. आणि हो नव्या साइट्स एकदा आई-बाबांना दाखवायच्या आणि मग तिथे शिरायचं बरका!

का?

तुमच्याच सेफ्टीसाठी.

मुलांच्या न्यूज साइट्स कुठे पाहायच्या? 

 https://currentkids.in  
https://www.dogonews.com

या त्या दोन साइट्स!!

Web Title: Why should kids watch Adults news? watch kids news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.