जगात सगळीकडे पिझ्झा मिळत नव्हता, तेव्हाचं जग कसं होतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 06:52 PM2020-05-21T18:52:50+5:302020-05-21T19:04:45+5:30

टाइम  ट्रॅव्हलची  गोष्ट 

World History Videos for Kids- screen time | जगात सगळीकडे पिझ्झा मिळत नव्हता, तेव्हाचं जग कसं होतं?

जगात सगळीकडे पिझ्झा मिळत नव्हता, तेव्हाचं जग कसं होतं?

Next
ठळक मुद्देतुम्ही युट्युबवर सर्च केलंत तर यापेक्षाही अधिक व्हिडीओज तुम्हाला बघायला मिळतील. 

आज जगातल्या कुठल्याही देशात तुम्ही गेलात तर काही गोष्टी सगळीकडे सारख्या आहेत. खाण्याच्या सवयी, भाषा, सण उत्सव वेगळे असले तरी सगळ्यांकडे इंटरनेट आहे. स्मार्ट फोन्स आहेत. जीन्स आणि टीशर्ट्स आहेत. आर्ट आणि क्राफ्टचं साहित्य साधारण सारखंच आहे. जगभरातल्या विविध देशांमध्ये वैविध्य असलं तरी समान गोष्टीही खूप आहेत. 
पूर्वी असं होतं का ?- तर नाही. कपड्यांपासून राहण्याच्या पद्धती, घर आणि जीवनशैली सगळंच वेगळं होतं. आज चिप्स, कोल्ड्रिंक, पिङझा, पास्ता आणि पावभाजी जवळपास सगळीकडे मिळते. पण पुरातन काळात असं नव्हतं. 
सिंधू संस्कृती असेल, इजिप्शिअन, मायन, चायनीज संस्कृती असेल इंका संस्कृती असेल या सगळ्या एकमेकांपासून खूपच वेगळ्या होत्या. पण सगळ्या पुरातन संस्कृती आहेत. 
तुम्हाला माहित्येय, सिंधू संस्कृतीत त्या काळी सांडपाण्याच्या व्यवस्था होत्या. स्विमिंग पूल्स होते. तर माया संस्कृतीने ?डव्हान्स कॅलेंडर तयार करून ते वापरत होते. इंका सिव्हिलायङोशनमध्ये शेतीचे अप्रतिम प्रयोग झाले होते. तर इजिप्शिअन संस्कृतीत पिरॅमिड्सची निर्मिती. तर चायनीज संस्कृतीने पहिल्यांदा पेपर आणि शाईची निर्मिती केली. 
या सगळ्या संस्कृतींबद्दल तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर खास मुलांसाठी खूप मस्त व्हिडीओज युट्युबवर आहेत. 
सर्च करा. 
1) सिंधू संस्कृतीसाठी: Indus Valley Civilization and More - World History Videos for Kids | Mocomi

 2) मायन संस्कृती: The rise and fall of the Inca Empire/TED-Ed

3) ग्रीस संस्कृती: Ancient Greece for Kids | History Learning Video

4) इजिप्शिअन संस्कृती: Ancient Egypt for Kids/EdYouToo

5) चिनी संस्कृती:  History Of Ancient China | Dynasties, Confucius, And The First Emperor

तुम्ही युट्युबवर सर्च केलंत तर यापेक्षाही अधिक व्हिडीओज तुम्हाला बघायला मिळतील. 


 

Web Title: World History Videos for Kids- screen time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.