निश्चिंत राहा... 'सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होईल'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 04:31 PM2019-07-14T16:31:54+5:302019-07-14T16:33:13+5:30
सोलापूर ते उस्मानाबाद रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
उस्मानाबाद - खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोलापूर-उस्मानाबादरेल्वेमार्गाचं काम सुरू असून भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या रेल्वेमार्गाची कुठलिही काळजी करू नका, तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही दिलेल्या मतांना मी कुठेही कमी पडू देणार असे म्हणत ओमराजे निंबाळकर यांनी सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासंदर्भात रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केल्याचेही सांगितले.
सोलापूर ते उस्मानाबाद रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. अर्थसंकल्पात यासाठी कुणी म्हणतंय 1 कोटी, कुणी म्हणतंय 5 कोटी तरतूद केलीय. हे ऐकून मीही थोडा अस्वसथ झालो होतो. पण, मी स्वत: रेल्वेमंत्र्यांकडे गेलो होतो. त्यावेळी, रेल्वेकडून भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून एक महिन्यात याबाबत सोलापूर आणि उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे पाठवली जातील, असे सांगण्यात आले. तसेच भूसंपादन अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार पैशाची तरतूद रेल्वेकडून करुन देण्यात येईल. त्यामुळे 1 कोटी आणि 5 कोटी हा चर्चेचा विषय संपुष्टात आहे, असे रेल्वेमंत्र्यांनी मला सांगितले. त्यामुळे तुम्ही सर्वांनी निश्चित राहावे, मी लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन कशाप्रकारे हा रेल्वे मार्ग आणि रेल्वे स्थानकांचा आराखडा आहे, यासंदर्भात चर्चा करणार आहे. तसेच, या मार्गात जमिनी येणाऱ्या शेतकऱ्यांचेही नुकसान होणार नाही, याची मी काळजी घेईन, असेही निंबाळकर यांनी सांगितले.
दरम्यान, उस्मानाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना खासदार ओमराजे यांनी ही माहिती दिली.