१४ महिन्यांत १० महिलांची हत्या, मर्डरचा पॅटर्न एकच, या शहरात फिरतोय सीरियल किलर  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 04:51 PM2024-08-08T16:51:19+5:302024-08-08T16:53:30+5:30

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील बरेली येथे एका माथेफिरूकडून एका पाठोपाठ एक महिलांच्या हत्या होत असल्याने खळबळ उडाली आहे. तसेच हा खुनी अद्याप पोलिसांच्या हाती न लागल्याने दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

10 women were killed in 14 months, the pattern of murder is the same, a serial killer is roaming in this city   | १४ महिन्यांत १० महिलांची हत्या, मर्डरचा पॅटर्न एकच, या शहरात फिरतोय सीरियल किलर  

१४ महिन्यांत १० महिलांची हत्या, मर्डरचा पॅटर्न एकच, या शहरात फिरतोय सीरियल किलर  

उत्तर प्रदेशमधील बरेली येथे एका माथेफिरूकडून एका पाठोपाठ एक महिलांच्या हत्या होत असल्याने खळबळ उडाली आहे. तसेच हा खुनी अद्याप पोलिसांच्या हाती न लागल्याने दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी एक स्केच प्रसिद्ध करून आरोपीची माहिती देण्याचं आवाहन केलं आहे. या माथेफिरूने मागच्या १४ महिन्यांमध्ये १० महिलांची हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. 

एकापाठोपाठ एक होत असलेल्या महिलांच्या हत्यांचं गुढ उकलण्यात पोलिसांना अद्याप तरी अपयश आलं आहे. या हत्यांचा उलगडा करण्याचा जेवढा प्रयत्न पोलीस करत आहेत, तेवढंच हे प्रकरण अधिकाधिक गुंतागुंतीचं होत चाललं आहे. त्यात पाठोपाठ होत असलेल्या महिलांच्या हत्यांमुळे या गावांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. या प्रकरणी आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत तीन स्केच प्रसिद्ध केले आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी एकाच प्रकारे महिलांची हत्या करत आहे. 

याबाबत पोलीस अधिकारी मानुष पारिक यांनी सांगितले की, बरेलीमधील शाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या महिलांच्या मृतदेहांसंदर्भात आतापर्यंत तीन स्केच प्रसिद्ध करण्यात आले आहेत. स्केचमध्ये पाहून आरोपींची ओळख पटवणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. 

बरेलीमधील शाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत हौसपूर येथील रहिवासी सोमपाल याची ४५ वर्षीय पत्नी अनीता हिची हत्या करून तिचा मृतदेह उसाच्या शेतात फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे या हत्यांमागे सीरियल किलर असल्याचा पोलिसांना असलेला संशय बलावला आहे. ही हत्या मागच्या वर्षी करण्यात आलेल्या ९ महिलांच्या हत्येप्रमाणेच करण्यात आली आहे. त्यात आडवाटेला महिलांचा गळा आवळून हत्या केली जाते. या प्रकरणात साडीने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. तसेच पुन्हा एकदा महिलेची हत्या झाल्याने त्याचा तपास करणं हे पोलिसांसाठी आव्हानात्मक बनलं आहे.  

Web Title: 10 women were killed in 14 months, the pattern of murder is the same, a serial killer is roaming in this city  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.