हृदयद्रावक! सायकलवरून घरी जात असलेल्या विद्यार्थिनीची ओढणी ओढली; अपघातात तरूणीचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 01:48 PM2023-09-17T13:48:45+5:302023-09-17T13:49:12+5:30

उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यात अंगावर काटा आणणारी घटना घडली.

 2 thugs in Ambedkarnagar district of Uttar Pradesh molest a student who was riding a bicycle in which she died, police have arrested the accused  | हृदयद्रावक! सायकलवरून घरी जात असलेल्या विद्यार्थिनीची ओढणी ओढली; अपघातात तरूणीचा जागीच मृत्यू

हृदयद्रावक! सायकलवरून घरी जात असलेल्या विद्यार्थिनीची ओढणी ओढली; अपघातात तरूणीचा जागीच मृत्यू

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यात अंगावर काटा आणणारी घटना घडली. महाविद्यालयातून घरी परतत असताना सायकलवरून चाललेल्या तरूणीची नराधमांनी ओढणी ओढली. नराधमांनी ओढणी ओढताच तरूणी खाली पडली अन् मागून येणाऱ्या मोटारसायकलने तिला धडक दिली. या अपघातात तरूणीला आपला जीव गमवावा लागला. शाबाज आणि फैसल अशी ही घटना घडवणाऱ्या आरोपींची नावे असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. 
 
खरं तर संबंधित विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचे कळताच दोघेही आरोपी फरार झाले. पण, पोलीस अधिकाऱ्यांना आरोपींची माहिती मिळताच त्यांनी त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना केले. पोलिसांना आरोपींचा सुगावा लागताच दोन्ही नराधमांनी पोलिसांच्या बंदुका हिसकावून घेण्यास सुरुवात केली. या झटपटीत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी जखमी झाले आहेत. 

अपघातात तरूणीचा मृत्यू 
दरम्यान, ही घटना शुक्रवारची असल्याचे कळते. हंसवार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेली विद्यार्थिनी दुपारी महाविद्यालयातून सायकलवरून घरी परतत होती. तरूणी जवळच्या बाजारपेठेजवळ येताच दुचाकीवरून आलेल्या दोन नराधमांनी तिची छेड काढली. त्यानंतर दोघांनी विद्यार्थिनीला शिवीगाळ करत तिची ओढणी ओढण्यास सुरूवात केली. अशातच विद्यार्थिनीचे सायकलवरील नियंत्रण सुटले आणि ती जमिनीवर पडली. त्यानंतर पाठीमागून येणारी दुचाकी विद्यार्थिनीच्या अंगावर आल्याने ती तिथेच गंभीर जखमी झाली होती. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.  

Web Title:  2 thugs in Ambedkarnagar district of Uttar Pradesh molest a student who was riding a bicycle in which she died, police have arrested the accused 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.