ज्ञानवापी प्रकरणात 4 महिला थेट सुप्रिम कोर्टात, केली मोठी मागणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 12:50 PM2024-10-22T12:50:51+5:302024-10-22T12:51:40+5:30

त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करत वाराणसीतील ज्ञानवापी परिसराशी संबंधित 15 खटले अलाहाबाद उच्च न्यायालयात ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहो. या शिवाय...

4 women directly in the Supreme Court in the varanasi gyanvapi masjid case made a big demand case transfer to allahabad high court | ज्ञानवापी प्रकरणात 4 महिला थेट सुप्रिम कोर्टात, केली मोठी मागणी!

ज्ञानवापी प्रकरणात 4 महिला थेट सुप्रिम कोर्टात, केली मोठी मागणी!

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. चार महिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करत वाराणसीतील ज्ञानवापी परिसराशी संबंधित 15 खटले अलाहाबाद उच्च न्यायालयात ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहो. या शिवाय याचिकाकर्ता महिलांनी ज्ञानवापीमध्ये दर्शन आणि पूजनाची परवानगी मिळावी, अशी मागणीही केली आहे.

जिल्हा न्यायालयात 9 तर दिवाणी न्यायाधिशांच्या न्यायालयात 6 खटले प्रलंबित -
ज्ञानवापीशी संबंधित जवळपास 15 खटले जिल्हा न्यायालय व दिवाणी न्यायाधीश यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे. यांपैकी जिल्हा न्यायालयात 9 तर दिवाणी न्यायाधिशांच्या न्यायालयात 6 खटले प्रलंबित आहेत. हे खटले आलाहाबाद उच्च न्यायालयात ट्रान्सफर करण्याची मागणी करण्यात आली आहे. जेनेकरून सर्व खटले एकाच ठिकाणी चालतील. 

दर्शन आणि पूजनासंदर्भातील आहे प्रकरण - 
ज्ञानवापी परिसरात दर्शन आणि पूजनाशी संबंधित खटले वाराणसीतील कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित आहेत. याचिकाकर्ता लक्ष्मी देवी आणि तीन इतर महिलांनी वकील विष्णु शंकर जैन यांच्या मार्फत अर्ज दाखल करत, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ विभाग आणि जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांमध्ये कायद्यांशी संबंधित काही महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश आहे. यासंदर्भात केवळ उच्च न्यायालयानेच निर्णय द्यायला हवा. 
 

 

 

Web Title: 4 women directly in the Supreme Court in the varanasi gyanvapi masjid case made a big demand case transfer to allahabad high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.