५८ वर्षीय सासूने दिला बाळाला जन्म; विधवा सुनेनं घेतली कुटुंब न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 10:40 AM2023-05-23T10:40:24+5:302023-05-23T12:33:05+5:30

सैंया निवासी तरुणीने सांगितले की, ४ वर्षांपूर्वी तिचं लग्न कमला नगर ठाणे परिक्षेत्रातील जीम संचालकासोबत झाले होते

58-year-old mother-in-law gives birth to a baby; Widow's daughter-in-law runs to Family court in agra | ५८ वर्षीय सासूने दिला बाळाला जन्म; विधवा सुनेनं घेतली कुटुंब न्यायालयात धाव

५८ वर्षीय सासूने दिला बाळाला जन्म; विधवा सुनेनं घेतली कुटुंब न्यायालयात धाव

googlenewsNext

उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील कुटुंब न्यायालयात रविवारी वेगळच प्रकरण समोर आलं. ५८ वर्षांच्या सासूबाईने मुलाला जन्म दिला. त्यामुळे, त्यांच्या विधवा सुनेनं गोंधळ घातला. सासू-सासऱ्यांकडून आपणास संपत्तीत वाटा न देण्यासाठीच मुलाला जन्म घालण्यात आल्याचा आरोप विधवा सुनेनं केला आहे. काऊंसलिंगद्वारे हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न येथील न्यायालयात करण्यात आला. मात्र, सुनेनं घेतलेल्या भूमिकेमुळं हा तिढा कायम राहिला. न्यायालयाने पुढील तारीख देऊ केली आहे.

सैंया निवासी तरुणीने सांगितले की, ४ वर्षांपूर्वी तिचं लग्न कमला नगर ठाणे परिक्षेत्रातील जीम संचालकासोबत झाले होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी तिच्या पतीचे हर्ट अॅटकने निधन झाले. त्यांना मुल-बाळही नव्हते, त्यामुळे पतीच्या निधनानंतर युवती माहेर जाऊन राहू लागली. मृत महिलेचा पती त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे, महिलेने सासू-सासऱ्याच्या संपत्ती हिस्सा मागितला. त्यावर, सासू-सासऱ्यांना संपत्तीतील वाटा देण्यास नकार दिला. त्यामुळे, हे प्रकरण कुटुंब न्यायालयात पोहोचले. रविवारी दोन्ही पक्षांना न्यायालयाने काऊंसलिंगसाठी बोलावले होते. मात्र, अद्याप मार्ग निघाला नाही. 

दरम्यान, विधवा युवतीने आरोप लावला आहे की, मी सासू-सासऱ्यांकडे पतीच्या संपत्तीचा हिस्सा मागितला होता. मात्र, त्यांनी देण्यास नकार दिला. शिवाय, ५ महिन्यांपूर्वी माझ्या ५८ वर्षीय सासूबाईंनी बाळाला जन्म दिला. सासू-सासऱ्यांनी या वयातही नवीन वारस जन्माला घातला. कारण, त्यांना सगळी संपत्ती ही त्यांच्या या मुलाच्या नावे करायची आहे, असा आरोप विधवा सुनेनं केला आहे. तर, मुलीच्या सासऱ्याने आपली बाजू मांडताना सांगितले की, आम्ही सुनेला गावात राहण्याचे सूचवले. पण, ती गावात राहत नसून माहेरी गेली. तर, गावाकडे घर बांधलेलं नाही, जेव्हा घर बांधतील तेव्हा मी तेथे राहायला जाईन, असे विधवा सुनेचं म्हणणं आहे. अद्याप याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. 
 

Web Title: 58-year-old mother-in-law gives birth to a baby; Widow's daughter-in-law runs to Family court in agra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.