उत्तर प्रदेशात भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेल्या टेम्पोवर टँकर उलटला, ९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 06:46 PM2023-07-10T18:46:45+5:302023-07-10T18:47:07+5:30

Pratapgarh Road Accident : टेम्पोमध्ये प्रवास करणाऱ्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

 9 killed in an accident between a tanker and a tempo at Pratapgarh in Uttar Pradesh  | उत्तर प्रदेशात भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेल्या टेम्पोवर टँकर उलटला, ९ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेल्या टेम्पोवर टँकर उलटला, ९ जणांचा मृत्यू

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यात सोमवारी एक भीषण अपघात झाला. इथे प्रवाशांनी भरलेल्या टेम्पोवर टँकर उलटल्याने तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर चार जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.

माहितीनुसार, प्रतापगढ जिल्ह्यातील लिलापूर परिसरात दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुमारे तेरा प्रवासी घेऊन एक टेम्पो प्रतापगढहून येत असल्याचे सांगण्यात आले. तर मोहनगंजकडून येत असलेला एक टँकर अचानक अनियंत्रित झाला अन् नऊ जणांचा जीव घेतला.

दरम्यान, टँकर टेम्पोवर पलटी झाल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात टेम्पोमध्ये प्रवास करणाऱ्या ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ५ जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय अन्य ४ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रकमध्ये काही गॅस भरला होता, जो अपघातानंतर लिक झाला.

Web Title:  9 killed in an accident between a tanker and a tempo at Pratapgarh in Uttar Pradesh 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.