समाजवादी पक्षाला मोठा धक्का, बड्या नेत्याने दिला राजीनामा, भाजपात प्रवेश करणार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 03:55 PM2023-07-15T15:55:52+5:302023-07-15T15:56:51+5:30

Uttar Pradesh Politics: उत्तर प्रदेशमधील राजकारणात विधानसभा निवडणुकीनंतर मोठे बदल होताना दिसत आहेत. एकीकडे राज्यातील विरोधी पक्ष कमकुवत होत असतानाच भाजपाचं स्थान मात्र बळकट होत आहे.

A big blow to the Samajwadi Party, a big leader Dara Singh Chauhan resigned, will he join the BJP? | समाजवादी पक्षाला मोठा धक्का, बड्या नेत्याने दिला राजीनामा, भाजपात प्रवेश करणार? 

समाजवादी पक्षाला मोठा धक्का, बड्या नेत्याने दिला राजीनामा, भाजपात प्रवेश करणार? 

googlenewsNext

उत्तर प्रदेशमधील राजकारणात विधानसभा निवडणुकीनंतर मोठे बदल होताना दिसत आहेत. एकीकडे राज्यातील विरोधी पक्ष कमकुवत होत असतानाच भाजपाचं स्थान मात्र बळकट होत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला कडवी टक्कर देणाऱ्या अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षालाही गळती लागली आहे. समाजवादी पक्षातील बडे नेते आणि मऊमधील घोसी विधानसभा मतदारसंघातील आमदार दारा सिंह चौहान यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. दारा सिंह चौहान यांनी विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. आता दारा सिंह चौहान हे पुन्हा एकदा भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दारा सिंह चौहान यांनी योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. तसेच समाजवादी पक्षाच्या तिकिटावर ते घोसी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. दारा सिंह चौहान यांच्या राजीनाम्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात उलथापालथील वेग आला आहे.

दरम्यान, दारा सिंह चौहान हे पूर्वांचलमधील एका जागेवरून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत लढणार असल्याची चर्चा आहे. ते मऊ किंवा घोसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. दारा सिंह चौहान हे योगींच्या पहिल्या सरकारमध्ये मंत्री होते. मात्र २०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या ऐन आधी त्यांनी मंत्रिपदासह भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांच्यासोबतच स्वामी प्रसाद मौर्य आणि धर्म सिंह सैनी यांनीही समाजवादी पक्षात प्रवेश केला होता.  

Web Title: A big blow to the Samajwadi Party, a big leader Dara Singh Chauhan resigned, will he join the BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.