लग्नाच्या पहिल्याच रात्री जोडप्याचा मृत्यू; पोस्टमोर्टम रिपोर्टने सगळेच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 01:40 PM2023-06-06T13:40:12+5:302023-06-06T13:40:43+5:30

मृत प्रतापच्या आईनं डोक्यावर पदर घेतलेल्या सुनेला आनंदाने सर्व विधी पार पाडत खोलीपर्यंत पोहचवले. आईला तो दु:खद क्षण आठवायलाही भीती वाटते.

A couple dies on their first wedding night; Everyone is shocked by the postmortem report | लग्नाच्या पहिल्याच रात्री जोडप्याचा मृत्यू; पोस्टमोर्टम रिपोर्टने सगळेच हैराण

लग्नाच्या पहिल्याच रात्री जोडप्याचा मृत्यू; पोस्टमोर्टम रिपोर्टने सगळेच हैराण

googlenewsNext

बहराइच - हनीमूनच्या दुसऱ्या दिवशी आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळलेले नवविवाहित जोडपे प्रताप आणि पुष्पा यांचा पोस्टमोर्टम रिपोर्ट आता समोर आला आहे. या दोघांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं शवविच्छेदनाच्या अहवालात नमूद करण्यात आल्याने नव्या चर्चेला उधाण आले आहे. वैद्यकीय शास्त्रासाठीही संशोधनाचा विषय बनलेल्या या प्रकरणामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. एकाच रात्री एका तरुण विवाहित जोडप्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू कसा होऊ शकतो? मात्र, शवविच्छेदन अहवालाबाबत मृतांचे नातेवाईक पूर्णपणे अनभिज्ञ आहेत.

मृताचे वडील सुंदरलाल हे आजच आपल्या सून आणि मुलाच्या अस्थी गंगेत विसर्जित करून परतले आहेत. डोळ्यात अश्रू आणत वृद्ध सुंदरलाल यांनी एका रात्रीत त्यांचे संपूर्ण जग उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले. त्यांना ३ मुलगे आहेत पण घर चालवणारा प्रताप हा सर्वात हुशार मुलगा होता. आता आम्ही कुणाच्या आधारे जगणार असं सांगत वडील धाई मोकलून रडले. रात्री उशिरापर्यंत घरात आनंदाचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले. घरात नव वधू-वर भाऊ-बहिणीसह अंगणात मनसोक्त नाचत होते. काही तासांनी असं काही घडले या घटनेची कोणालाच कल्पना नव्हती.

मृत प्रतापच्या आईनं डोक्यावर पदर घेतलेल्या सुनेला आनंदाने सर्व विधी पार पाडत खोलीपर्यंत पोहचवले. आईला तो दु:खद क्षण आठवायलाही भीती वाटते. मुलगा आणि सून एकमेकांना आधीपासून ओळखत होते. कुणालाही या लग्नापासून आक्षेप नव्हता. रात्री उशीरापर्यंत नाचगाणे सुरू होते. सर्वांनी रात्री जेवण केले. घरात पाहुणे मंडळी असल्याने रात्रभर आई कामात गुंतली होती. सर्व काम ओटापून त्या रात्री १ तास आई झोपायला गेली. मुलगा सून त्यांच्या खोलीत गेले. सकाळी ते लवकर आले नाहीत तरी आईने त्यांना उठवले नाही. कारण लग्नामुळे २ दिवस कुणालाही विश्रांती घेता आली नव्हती. काही वेळाने मुलांना आवाज देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यानंतर छोट्या मुलीला खिडकीतून खोलीत पाठवले तेव्हा तिने आतून दरवाजा उघडला. आम्ही मुलगा-सूनेकडे पाहिले तर ते दोघेही मृतावस्थेत होते.

मृत जोडप्याच्या खोलीवर संशय

लग्नामुळे अनेक भांडी इकडेतिकडे पडली होती. मृत प्रतापच्या खोलीत संशयास्पद बाबी समोर आल्या. त्याच्या खोलीत हवा पास होण्यासाठी केवळ एकच खिडकी होती. घरात वीज नव्हती. त्या रात्री नवविवाहित जोडप्याने दरवाजाकडील ती खिडकी पूर्णत: बंद ठेवली होती. घटनेबाबत पोलिसांना कळवले. ते खोलीत दाखल झाले तेव्हा काही दिवसांपूर्वीच खोलीला रंग दिल्याचे समोर आले. त्या रंगाचा खोलीत अद्यापही वास येत होता. या खोलीतील उष्णतेमुळे तिथे थांबणेही कठीण होते. बंद खोलीत रंगाच्या केमिकल दुर्गंधीमुळे कदाचित या दोघांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवला गेला. परंतु पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये मृत्यू हार्टअटॅकने झाल्याचे समोर आले.

Web Title: A couple dies on their first wedding night; Everyone is shocked by the postmortem report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.