अयोध्येतील श्री राम मंदिरात 'सोन्याचा' दरवाजा; एकूण ४२ द्वार, चंडीगढची खास वीट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 06:17 PM2023-09-07T18:17:36+5:302023-09-07T18:22:23+5:30

मंदिरात एकूण ४२ दरवाजे बसवण्यात येत असून हे सर्व दरवाजे महाराष्ट्रातील चंद्रपूर येथून पाठवण्यात आलेल्या सागवानी लाकडापासून बनवले जात आहेत.

A golden door in the Sri Ram temple in Ayodhya; Total 42 gates | अयोध्येतील श्री राम मंदिरात 'सोन्याचा' दरवाजा; एकूण ४२ द्वार, चंडीगढची खास वीट

अयोध्येतील श्री राम मंदिरात 'सोन्याचा' दरवाजा; एकूण ४२ द्वार, चंडीगढची खास वीट

googlenewsNext

वाराणसी - अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा जवळ येत असून तेथील कामानेही गती पकडली आहे. मंदिराच्या नवीन बांधकामांसाठी मंदिर समितीकडून सर्वकाही भव्यदिव्य होत आहे. तर, भाविक भक्तांकडूनही आपल्या परीने योगदान देण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी युपीतील एका कुलूप बनवणाऱ्या व्यक्तीने राम मंदिरासाठी जगातील सर्वात मोठे कुलूप बनवल्याचे वृत्त मीडियात झळकले होते. अयोध्येतील राम मंदिरात एकूण ४२ दरवाजे बसवण्यात येणार आहेत. त्यापैकी मंदिराच्या गर्भग्रहात सोन्याचा दरवाजा बसवण्यात येणार आहे.

मंदिरात एकूण ४२ दरवाजे बसवण्यात येत असून हे सर्व दरवाजे महाराष्ट्रातील चंद्रपूर येथून पाठवण्यात आलेल्या सागवानी लाकडापासून बनवले जात आहेत. मात्र, मंदिराच्या गर्भग्रहात सोन्याचा दरवाजा बसवण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी दिली. यासह, मंदिराच्या इतर दरवाज्यांवर सुंदर व कोरिव नक्षीकाम केले जाणार आहे. त्यामध्ये, मोर, कलश, चक्र आणि फुलांचे नक्षीकाम होणार आहे. मात्र, गर्भग्रहाची चमक वेगळीच असणार आहे. 

गर्भग्रहाच्या भिंती आणि फरशीवर मकरानाचे पांढरे मार्बल असणार आहे. ज्यामध्ये इनले कलाकारी असणार आहे. येथे प्रभू श्रीराम यांच्या बालवयातील २ लहान मूर्ती असणार आहेत. त्यातील एक मूर्ती चल तर दुसरी मूर्ती अचल असणार आहे. अयोध्येत तीन मूर्ती बनवण्यात येत असून त्यातील एक मूर्ती गर्भग्रहात विराजमान होईल.

दरम्यान, राम मंदिरात सोन्याच्या दरवाजासह राजस्थानमधून आणलेलं पहाडपूरचं सँडस्टोन, मकराना मार्वल, तेलंगणाचं ग्रेनाईट, महाराष्ट्रातील लाकडाचा वापर करण्यात येत आहे. तसेच, मंदिरात बसवण्यासाठी चंडीगढ येथे खास वीट बनवण्यात येणार आहे. 
 

Web Title: A golden door in the Sri Ram temple in Ayodhya; Total 42 gates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.