UP : मॉलमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ३ तासांच्या छापेमारीत ९९ तरूण-तरूणींना पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 04:07 PM2023-05-25T16:07:33+5:302023-05-25T16:09:17+5:30
इतरही स्पा सेंटर्सची चौकशी करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील लिंक रोड परिसरातील पॅसेफिक मॉलमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. ३ तास चालेल्या छापेमारीत ९९ जणांना पकडले आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली हे रॅकेट चालवले जायचे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर बुधवारी छापेमारी करण्यात आली. या छापेमारीनंतर तब्बल ९९ तरूण-तरूणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, ६९ तरूणी आणि ३९ तरूणांची पोलीस चौकशी करत आहेत. या स्पा सेंटरमधून काही आक्षेपार्ह वस्तू देखील जप्त करण्यात आल्या आहेत. पॅसिफिक मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पकडलेल्या ९९ जणांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. हे सर्व गाझियाबाद, नोएडासह दिल्ली-एनसीआर शहरातील रहिवासी आहेत.
पोलिसांकडून अधिक तपास सुरू
लक्षणीय बाब म्हणजे ताब्यात घेतलेल्या मुलींपैकी काहींना जबरदस्ती हे काम करायला लावले जात असल्याचीही माहिती समोर येत आहे. हा व्यवसाय कधीपासून सुरू होता आणि त्याचा सूत्रधार कोण, याचा तपास पोलीस करत आहेत. इथे अश्लील व्हिडीओ बनवले जात होते का? याचाही पोलीस तपास घेत आहेत. आता पोलीस ताब्यात घेतलेल्या तरुण-तरुणींची चौकशी करत आहेत. लवकरच इतरही स्पा सेंटर्सची चौकशी करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.