कॉन्स्टेबलशी अफेअर, तिच्यासोबत हॉटेलमध्ये सापडला; प्रेयसीमुळे DSP चा झाला थेट कॉन्स्टेबल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 08:23 AM2024-06-25T08:23:08+5:302024-06-25T08:26:41+5:30

महिला कॉन्स्टेबलसोबत हॉटेलमध्ये सापडला; प्रेयसीमुळे DSP चा झाला थेट कॉन्स्टेबल

affair with constable, found with her in hotel Beloved DSP made direct constable | कॉन्स्टेबलशी अफेअर, तिच्यासोबत हॉटेलमध्ये सापडला; प्रेयसीमुळे DSP चा झाला थेट कॉन्स्टेबल

कॉन्स्टेबलशी अफेअर, तिच्यासोबत हॉटेलमध्ये सापडला; प्रेयसीमुळे DSP चा झाला थेट कॉन्स्टेबल

उन्नाव : शक्यतो लोकांना आपल्या कामात घेत असलेल्या मेहनतीमुळे नोकरीत प्रमोशन मिळत जाते, मात्र उन्नावचे पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) असलेले कृपाशंकर कनोजिया यांना मात्र डीएसपी पदावरून हटवत थेट कॉन्स्टेबल बनवण्यात आले. कानपूरमधील एका हॉटेलमध्ये महिला कॉन्स्टेबलसोबत पकडल्यानंतर त्यांचे डिमोशन करण्यात आले आहे.

पीएसीमध्ये कॉन्स्टेबल पदावरून प्रमोशन मिळाल्यानंतर कृपाशंकर डीएसपी पदापर्यंत पोहोचले होते. २२ जून रोजी अतिरिक्त पोलिस महासंचालक यांनी जारी केलेल्या आदेशानंतर त्यांना पीएसीच्या २६ बटालियनमध्ये तैनात करण्यात आले.

कॉन्स्टेबलशी अफेअर
- कृपाशंकर यांना जुलै २०२१ मध्ये उन्नाव जिल्ह्यातील बिघापूर सर्कलमध्ये सीओ म्हणून नियुक्त करण्यात आले.
- यादरम्यान त्यांचे एका महिला कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध सुरू झाले होते. दोघेही आधीच विवाहित आहेत. 
- महिलेचा पती प्रयागराज येथील पोलिस ठाण्यात हवालदार म्हणून तैनात होता.

दोघांना असे पकडले...

  • ६ जुलै २०२१ रोजी कृपाशंकर यांनी उपचारासाठी रजा घेतली होती. मात्र घरी जाण्याऐवजी ते महिला कॉन्स्टेबलसोबत कानपूर येथील एका हॉटेलवर गेले. कृपाशंकर यांनी तिच्या नावावर रूम बुक केली.
  • या दरम्यान पत्नीने त्यांना फोन केला असता त्यांचा फोन बंद असल्याचे आढळले. यानंतर पत्नीने थेट उन्नावचे एसपी आनंद कुलकर्णी यांना फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला.
  • पोलिसांनी त्यांचे लोकेशन शोधले असता ते कानपूरच्या मॉल रोडवरील हॉटेलमध्ये सापडले. यानंतर पोलिसांचे पथक हॉटेलवर पोहोचले असता कृपाशंकर सायंकाळी ५ वाजल्यापासून एका महिलेसोबत खोलीत असल्याचे आढळून आले. यावेळी कृपाशंकर आणि त्यांच्या पत्नीमध्ये जोरदार वाद झाला.

कॉन्स्टेबलच्या पतीने दिला घटस्फोट
हॉटेलमध्ये प्रवेश करताना कृपाशंकर आणि त्यांची प्रेयसी सीसीटीव्हीत कैद झाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज सोबत घेतले. प्रशासनानी प्रतिमा खराब केल्याबद्दल कृपाशंकर यांना थेट कॉन्स्टेबल करण्यात आले. मात्र, महिला कॉन्स्टेबल सध्या उन्नावच्या माखी पोलिस ठाण्यात तैनात आहे. या प्रकरणानंतर महिला कॉन्स्टेबलच्या पतीने तिला घटस्फोट दिला आहे.

Web Title: affair with constable, found with her in hotel Beloved DSP made direct constable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.