अग्निवीर योजना बंद करणार; सपाचा जाहीरनामा प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 12:50 PM2024-04-11T12:50:39+5:302024-04-11T12:51:24+5:30
जाहीरनाम्यात सपाने २०२५ पर्यंत जात आधारित जनगणना करण्याचे प्रमुख आश्वासन दिले आहे.
राजेंद्र कुमार
लोकमत न्यूज नेटवर्क
लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी आपला अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनाम्यात सपाने २०२५ पर्यंत जात आधारित जनगणना करण्याचे प्रमुख आश्वासन दिले आहे.
nअग्निवीर योजना समाप्त करून नियमित भरती
nमहिलांना संसदेत ३३ टक्के आरक्षण
nगरीब महिलांना मासिक ३ हजार पेन्शन
nअल्पभूधारक शेतकऱ्यांना मासिक ५ हजार पेन्शन
n२०२४ च्या शेवटपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी
nमुलींना पदव्युत्तर पदवीपर्यंत मोफत शिक्षण
तरुणांना लॅपटॉप देणार
nमनरेगातील मजुरी ४५० रुपयांपर्यंत वाढणार.
nसर्व शासकीय विभागातील रिक्त पदे तातडीने भरणार
nगव्हाच्या जागी पीठ दिले जाईल.
nप्रत्येक कुटुंबाला ५०० रुपयांचा मोबाइल डेटा