बापरे! ATM मधून 100 ऐवजी अचानक निघाल्या 500 च्या नोटा; पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 09:39 PM2023-06-24T21:39:43+5:302023-06-24T21:45:08+5:30

एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने 100 ऐवजी 500 च्या नोटा बाहेर पडतात ही बाब कळताच एकच खळबळ उडाली.

agra atm suddenly dispensed 500 notes instead of 100 crowd of people withdrawing money | बापरे! ATM मधून 100 ऐवजी अचानक निघाल्या 500 च्या नोटा; पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड

बापरे! ATM मधून 100 ऐवजी अचानक निघाल्या 500 च्या नोटा; पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड

googlenewsNext

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आग्रा येथील शास्त्रीपुरम प्राक्षी एन्क्लेव्ह शाखेत असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने 100 ऐवजी 500 च्या नोटा बाहेर पडू लागल्या. एटीएममधून पैसे काढणाऱ्या लोकांनी पैसे काढल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. एटीएममधील बिघाडाचा लोकांनी फायदा घेतला. यामुळे घटनास्थळी काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. 

एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने 100 ऐवजी 500 च्या नोटा बाहेर पडतात ही बाब कळताच एकच खळबळ उडाली. घटनास्थळी कॅश कलेक्शन टीम पोहोचली. टीम घटनास्थळी पोहोचली तोपर्यंत एटीएममधून सुमारे 1,72,000 रुपये काढण्यात आले होते. एटीएमची अवस्थाही बिकट झाली होती.  पैशांसाठी एटीएमचीही तोडफोड करण्यात आली आहे.

सीएमएस कंपनीचे ब्रांच मॅनेजर अंशुल मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएममध्ये 1,72,000 रुपये होते, त्यांना एमएसपीकडून माहिती मिळाली होती की एटीएममधून 100 रुपयांऐवजी 500 रुपयांच्या नोटा येत आहेत. ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा लोकांनी आधीच पैसे काढून घेतले होते. एटीएम उघडे पडले होते. आतापर्यंत एकूण किती रक्कम काढण्यात आली याचा डेटा काढला जात आहे. 

एटीएममधून पैसे कोणी काढले आहेत, जास्तीचे पैसे कोणी नेले याचीही माहिती बँकेला देण्यात आली आहे. त्यांची चौकशी करून त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील. मात्र एटीएममध्ये काही छेडछाड झाल्याचा अंदाज बँक कर्मचाऱ्यांकडून वर्तवला जात आहे. प्रथमदर्शनी हा तांत्रिक बिघाड असल्याचे मानले जात आहे. 

100 ऐवजी 500 च्या नोटा बाहेर आल्या आहेत. एटीएममध्ये बिघाड कसा झाला, याचा तपास सुरू असला तरी सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करून ज्यांनी जास्तीचे पैसे काढले त्यांच्या खात्यातून माहिती काढली जात आहे. सीएमएसचे शाखा व्यवस्थापक अंशुल मलिक यांनीही पोलीस चौकी प्राक्षी टॉवर शास्त्रीपुरम येथे तक्रार दाखल केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: agra atm suddenly dispensed 500 notes instead of 100 crowd of people withdrawing money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.