अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेपूर्वीच सुरू होणार विमानतळ, ३५० कोटींचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 06:53 PM2023-06-28T18:53:44+5:302023-06-28T18:57:45+5:30
लोकसभा निवडणुकांच्या अगोदर जानेवीर २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.
वाराणसी - अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन मंदिराचे दरवाजे सर्वसामान्य जनतेसाठी कधी खुले केले जाणार? या प्रश्नाचे उत्तर अखेर समोर आले आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी तारीखच जाहीर केली. १५ जानेवारी २०२४ ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. तर, गृहमंत्री अमित शहा यांनीही यासंदर्भात जाहीरपणे माहिती दिली होती. आता, अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठीचे विमानतळही लवकरच पूर्णत्वास येत आहे.
लोकसभा निवडणुकांच्या अगोदर जानेवीर २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. विशेष म्हणजे श्रीराम मंदिराचा हा उत्सव १० दिवस चालणार असून देशभरातील जनतेला या सोहळ्यात सहभागी करुन घेतलं जाणार आहे. तर, लाखो भाविक येथे दर्शनासाठी, या सोहळ्यासाठी येणार आहेत. त्यामुळे, अगोदरच तिकीट काढून ठेवा, अशा सूचनाही यापूर्वी अमित शहांनी केल्या होत्या.
प्रभु श्री राम के आशीर्वाद और प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के दृढ़ संकल्प से राम जन्मभूमि, अयोध्या पर एक नवीन हवाईअड्डा आकार ले रहा है। रु 350 करोड़ की लागत से तैयार हो रहे इस हवाईअड्डे का निर्माण कार्य सितम्बर 2023 तक पूर्ण हो जाएगा।
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) June 28, 2023
6250 वर्ग मीटर में फैले हवाईअड्डे के… pic.twitter.com/fB1GEiHNOd
प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अयोध्येत एक नवीन विमानतळ तयार होत आहे. ३५० कोटी रुपये खर्चून तयार होत असलेल्या या विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू असून सप्टेंबर २०२३ पर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. तसेच, ६२५० मीटर वर्ग एवढ्या विस्तीर्ण जागेत पसरलेल्या या विमानतळाच्या अंतरिम भवनात श्री राम यांचं चित्रण करण्यात आलं आहे. ज्यामुळे, प्रवाशांना अध्यात्मिकतेची अनुभूती होईल. प्रभू श्रीराम यांची जीवनगाथाही येथून पाहायला मिळेल. तर, धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना समृद्धीचे नवे द्वारही खुले होईल, असे ज्योतिरादित्य शिंदेंनी ट्विट करुन म्हटलं आहे.