"ज्यांचे कुटुंब नाही ते...", दहावीतील विद्यार्थ्याच्या हत्येवरून अखिलेश यांची योगींवर बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 06:34 PM2023-11-01T18:34:51+5:302023-11-01T18:35:16+5:30

उत्तर प्रदेशातील कानपूर येथील विद्यार्थ्याच्या हत्येवरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारला लक्ष्य केले.

  Akhilesh Yadav has criticized Chief Minister Yogi Adityanath over the killing of a class 10th standard boy in Uttar Pradesh's Kanpur  | "ज्यांचे कुटुंब नाही ते...", दहावीतील विद्यार्थ्याच्या हत्येवरून अखिलेश यांची योगींवर बोचरी टीका 

"ज्यांचे कुटुंब नाही ते...", दहावीतील विद्यार्थ्याच्या हत्येवरून अखिलेश यांची योगींवर बोचरी टीका 

उत्तर प्रदेशातील कानपूर येथील विद्यार्थ्याच्या हत्येवरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारला लक्ष्य केले. येथील एका साडी व्यावसायिकाच्या १७ वर्षीय विद्यार्थ्याच्या हत्येवरून अखिलेश यांनी योगी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अखिलेश यादव म्हणाले की, ज्यांचे कुटुंब नाही ते इतरांच्या कुटुंबातील सदस्यांचे दुःख समजू शकत नाहीत. ज्या कुटुंबाने तरूण मुलगा गमावला त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावली असेल? पोलिसांकडून राजकीय काम करून घेतल्यास कायदा आणि सुव्यवस्था कशी सुधारेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ते लखनौमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 
 
दरम्यान, कानपूरमध्ये सोमवारी संध्याकाळी दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आली. त्याच्या कुटुंबीयांकडून ३० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या प्रश्नावर अखिलेश यादव म्हणाले की, जर तुम्ही पोलिसांकडून राजकीय काम करून घेतले तर कायदा आणि सुव्यवस्था चांगली होईल, अशी अपेक्षा का करता? मुलाचे अपहरण होऊन त्याचा जीव गेला. त्या कुटुंबावर काय आघात झाला असेल याची कल्पना करा. 

अखिलेश यादवांची बोचरी टीका 
तसेच ज्या कुटुंबाने आपला मुलगा गमावला आहे त्यांचे काय झाले असेल? उत्तर प्रदेशमधील ही पहिली घटना नाही. अलाहाबाद आणि चित्रकूटमध्येही हे घडले आहे. म्हणूनच मी पीडित कुटुंबीयांना सांगतो की, ज्यांचे कुटुंब नाही ते तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे दुःख समजू शकत नाहीत, असा टोला अखिलेश यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लगावला.

Web Title:   Akhilesh Yadav has criticized Chief Minister Yogi Adityanath over the killing of a class 10th standard boy in Uttar Pradesh's Kanpur 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.