अखिलेश यांचे लोकजागरण छोट्या काशीतून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 09:57 AM2023-06-08T09:57:01+5:302023-06-08T09:57:39+5:30

जात जनगणनेचा मुद्दा लावून धरणार

akhilesh yadav public awakening started | अखिलेश यांचे लोकजागरण छोट्या काशीतून सुरू

अखिलेश यांचे लोकजागरण छोट्या काशीतून सुरू

googlenewsNext

राजेंद्र कुमार, लोकमत न्यूज नेटवर्क, लखनौ : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मंगळवारी राज्यातील छोटी काशी (लखीमपूर खेरी) येथून लोकजागरण यात्रेला सुरुवात केली. सामाजिक न्याय आणि जात जनगणनेचा नारा देत आता संपूर्ण राज्यात ही यात्रा काढण्यात येणार आहे.

देवकली येथे पक्षाच्या प्रशिक्षण शिबिरात त्यांनी या यात्रेचा उद्देश स्पष्ट केला आणि जात जनगणनेचा मुद्दाही उपस्थित केला. जात जनगणना झाली पाहिजे व त्याची आकडेवारी खुली केली पाहिजे, असे त्यांचे मत आहे. लोकसभा निवडणुकीत जात जनगणनेचा मोठा मुद्दा बनणार आहे. आंबेडकरवादी, समाजवादी व लोहियावादी एकत्र आले तर भाजप हरेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

छोटी काशी म्हणून ओळखले जाणारे लखीमपूर खेरी हे राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळ आहे. तेथे गोला गोकर्णनाथाचे प्रसिद्ध मंदिर आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने अखिलेश यादव यांनी या धार्मिकनगरीत प्रशिक्षण शिबिर आयोजित करून नरम हिंदुत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. अखिलेश यादव यांचे संपूर्ण लक्ष बहुजन समाज पक्षाच्या दलित व्होट बँकेला खीळ घालण्यावर आहे. मायावतींवर भाजपचे सहयोगी असल्याचा आरोप केल्यामुळे सपाला वाल्मिकी, पासी, खाटिक या जातींचा पाठिंबा मिळू शकतो, असे अखिलेश यांना वाटते.

जनविरोधी धोरणे जनतेसमोर मांडा

शिबिराला संबोधित करताना अखिलेश यादव यांनी भाजपची जनविरोधी धोरणे जनतेमध्ये मांडण्याचा सल्ला दिला. देशात आणि राज्यात जेवढी खासगीकरणाला चालना दिली जाईल, तेवढे तुमचे अधिकार हिरावून घेतले जातील. बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे. डिझेल, पेट्रोल, सिलिंडरच्या किमती वाढत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तुम्ही आजपासूनच सज्ज व्हा आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात बूथ आणि सेक्टर स्तरावरील संघटन तयार करा, असेही अखिलेश कार्यकर्त्यांना म्हणाले.

 

Web Title: akhilesh yadav public awakening started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.