"आणखी दोन जोडले असते तर ४० झाले असते", एनडीएच्या बैठकीवर अखिलेश यादवांचा उपरोधिक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 08:38 AM2023-07-19T08:38:58+5:302023-07-19T09:24:11+5:30

विरोधकांनी आपल्या आघाडीला 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायंस' (इंडिया) असे नाव दिले आहे.

akhilesh yadav sarcastically on the meeting of 38 parties of nda | "आणखी दोन जोडले असते तर ४० झाले असते", एनडीएच्या बैठकीवर अखिलेश यादवांचा उपरोधिक टोला

"आणखी दोन जोडले असते तर ४० झाले असते", एनडीएच्या बैठकीवर अखिलेश यादवांचा उपरोधिक टोला

googlenewsNext

लखनौ :  आगामी म्हणजेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष जोरदार तयारी करीत आहेत. २०२४ ची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मंगळवारी दिल्लीत ३८ घटक पक्षांची बैठक घेत शक्तिप्रदर्शन केले. तर दुसरीककडे २६ विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी बंगळुरू येथे आयोजित केलेल्या बैठकीत भाजपला कसे पराभूत करावयाचे, यावर विचारमंथन केले. विरोधकांनी आपल्या आघाडीला 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायंस' (इंडिया) असे नाव दिले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक 'एनडीए' विरोधात 'इंडिया' अशी होणार, हे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, 'इंडिया जिंकवेल, इंडिया जिंकेल', असे बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांच्या बैठकीत सामील झालेल्या समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. तसेच, नवी दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये झालेल्या एनडीएच्या बैठकीबद्दल अखिलेश यादव यांनी उपरोधिक टोला लगावला आहे. ते म्हणाले, "आणखी दोन जोडले असते तर ३८ अधिक दोन पूर्ण ४० झाले असते... ती जुनी गोष्ट सर्वांनी ऐकली असेलच?" 

याचबरोबर, भारतीय इतिहास हा दिवस देशभक्ती आणि सकारात्मक राजकारणाच्या 'बंगळुरू चळवळीचा' दिवस म्हणून लक्षात ठेवेल, असे अखिलेश यादव यांनी ट्विट केले आहे. याशिवाय, भविष्यातील नवे अध्याय बंगळुरूपासून सुरू होतील. परिवर्तनासोबत हुकूमशहाला सत्तेतून बेदखल करू.... प्रत्येकाच्या खांद्यावर जबाबदारी आहे... आता नवी तयारी सुरू आहे, असेही अखिलेश यादव यांनी सोमवारी म्हटले होते.

अखिलेश यादव यांनी मंगळवारी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबतचे आपले विविध फोटो सोशल मीडियावर  शेअर केले आहेत. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) ठोस आव्हान देण्याच्या प्रयत्नात २६ विरोधी पक्षांनी मंगळवारी त्यांच्या आघाडीचे नाव 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायंस' (इंडिया) असे ठेवले. देशासमोर पर्यायी राजकीय, सामाजिक व आर्थिक अजेंडा मांडण्याचा संकल्प विरोधकांची बैठकीत व्यक्त केला. दोन दिवसीय बैठकीत विरोधी पक्षांनी युतीमध्ये एक समन्वयक आणि ११ सदस्यांची समन्वय समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. 

Web Title: akhilesh yadav sarcastically on the meeting of 38 parties of nda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.