खोदकाम करताना सापडली वडिलोपार्जित तिजोरी, टाळं उघडल्यावर समोर आलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 05:58 PM2023-06-18T17:58:32+5:302023-06-18T18:00:07+5:30
Ancient Vault: उत्तर प्रदेशमधील एटा येथे घरासाठी पाया खोदताना सापडलेल्या जुन्या वडिलोपार्जित तिजोरीचं गुपित अखेर उघड झालं आहे. अधिकाऱ्यांसमोर व्हिडीओग्राफी करत या जुन्या तिजोरीचं टाळं उघडण्यात आलं.
उत्तर प्रदेशमधील एटा येथे घरासाठी पाया खोदताना सापडलेल्या जुन्या वडिलोपार्जित तिजोरीचं गुपित अखेर उघड झालं आहे. अधिकाऱ्यांसमोर व्हिडीओग्राफी करत या जुन्या तिजोरीचं टाळं उघडण्यात आलं. टाळं उघडून तिजोरी उघडतात त्यामधून एक जोडी सोन्याचे टॉप्स, एक चांदीचं मंगळसूत्र आणि काही कागदपत्रं सापडली. तिजोरीमधून सापडलेल्या वस्तू घरमालकाकडे सुपूर्द करण्यात आल्या. तिजोरीचं टाळं उघडतान आजूबाजूला लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
एटा येथे एका पडझड झालेल्या घराच्या पुनर्बांधणीसाठी खोदकाम करत असताना एक वडिलोपार्जित जुनी तिजोरी सापडली होती. ही तिजोरी सापल्याची बातमी समजताच मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. तिजोरीमध्ये सोन्याचे दागिने, चांदीची नाणी असतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. तिजोरी सापडल्याची बातमी स्थानिक पोलिसांना समजली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी जात ती तिजोरी ताब्यात घेतली. त्यानंतर याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली.
ही माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एसडीएम आणि तहसीलदार यांची एक टीम बनवली. तसेच डीएमना या टीमसमोर तिजोरी खोलण्याचे आदेश दिले. शुक्रवारी दुपारी अधिकारी गावात पोहोचले. तसेच त्यांनी व्हिडीओग्राफी करत ही तिजोरी उघडायला लावली. त्यानंतर तिजोरीमध्ये सापडलेल्या सामानाची यादी करत ते साहित्य घरमालकाकडे सुपूर्द केले.
मिरहचीमधील पुन्हेरा गावात खोदकामामध्ये सापडलेली तिजोरी ज्या कुटुंबाची होती त्यांचे पूर्वज जुन्या काळात जमीनदार होते. त्यांनी मिरहचीमध्ये शाळेसाठी एक मोठा भूखंड दान म्हणून दिला होता. मात्रता त्या कुटुंबातील सदस्यांची आर्थिक स्थिती तितकीशी चांगली राहिलेली नाही. त्यांचं वडिलोपार्जित घर जीर्ण होऊन कोसळलं. आता प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळालेल्या घराचं बांधकाम तिथे करण्यासाठी पाया खोदण्याचं काम सुरू होतं. तेव्हाच ही तिजोरी सापडली.