सरयू एक्स्प्रेसमध्ये महिला शिपायावर हल्ला, पोलिसांनी आरोपीचं केलं एन्काऊंटर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 12:20 PM2023-09-22T12:20:17+5:302023-09-22T12:20:40+5:30
Uttar Pradesh Crime News: ड्युटी आटोपून परतत असलेल्या महिला शिपायावर सरयू एक्स्प्रेसमध्ये हल्ला करणारा आरोपी अनीस याला एसटीएफ आणि अयोध्या पोलिसांच्या पथकांनी संयुक्त कारवाईमध्ये ठार केलं आहे.
ड्युटी आटोपून परतत असलेल्या महिला शिपायावर सरयू एक्स्प्रेसमध्ये हल्ला करणारा आरोपी अनीस याला एसटीएफ आणि अयोध्या पोलिसांच्या पथकांनी संयुक्त कारवाईमध्ये ठार केलं आहे. तर इतर दोन आरोपी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पूराकलंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छतरिवा पारा केलमार्गावर ही चकमक झाली. या चकमकीत एसओ पुराकलंदर रतन शर्मा आणि इतर दोन शिपाई गोळी लागल्याने जखमी झाले आहेत.
सरयू एक्स्प्रेस ट्रेनमध्ये महिला शिपायावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात एसटीएफचे प्रमुख अमिताभ यश हे लखनौमध्ये प्रेस कॉन्फ्रन्स करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. श्रावण यात्रेदरम्यान, महिला शिपायावर हल्ला झाला होता. आता त्यांच्यावर लखनौ ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणाच्या खुलाशासाठी यूपी पोलीस, यूपी एसटीफ यांच्यासह रेल्वेही कार्यरत आहे. एवढंच नाही तर अलाहाबाद हायकोर्टानेही याची दखल घेतली होती.
आता या हल्ल्यातील मुख्य आरोपी अनीस पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला आहे. तर इतर दोघेजण जखमी झाले आहेत. आता एसटीएफचे प्रमुख अमिताभ यश हे लखनौमध्ये पत्रकार परिषद घेऊन हल्ल्याचा हेतू काय होता, याचा उलगडा करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोर जेव्हा ट्रेनमध्ये लुटालूट करत होते. तेव्हा महिला शिपायाचीही बॅग हिसकावण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. तेव्हा महिला शिपायाने त्यांना विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी या महिला शिपायाला गंभीररीत्या जखमी केले होते.