अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 09:37 PM2024-10-24T21:37:40+5:302024-10-24T21:37:55+5:30

Ayodhya Deepotsav 2024: या कार्यक्रमांतर्गत शरयू नदीच्या 55 ​​घाटांवर 28 लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत.

Ayodhya Deepotsav 2024: Lighting of 28 lakh lamps on 55 ghats in Ayodhya; Shri Ram Janmabhoomi will shine | अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...

अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...

Ayodhya Deepotsav 2024: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यंदाही अयोध्येचा आठवा दीपोत्सव भव्य-दिव्य पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने शरयू नदीच्या 55 घाटांवर 28 लाख दिवे प्रज्वलित करून नवा विश्वविक्रम करण्याची तयारी सुरू आहे. दीपोत्सवाच्या तयारीचा एक भाग म्हणून डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठाने दिवे आणि स्वयंसेवकांची संख्या निश्चित केली आहे, जेणेकरून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजनबद्ध काम मोठ्या प्रमाणावर करता येईल.

या कार्यक्रमांतर्गत शरयू नदीच्या 55 ​​घाटांवर 28 लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. घाट संयोजकांच्या देखरेखीखाली राम की पायडी, चौधरी चरणसिंग घाट आणि भजन संध्या स्थळासह इतर सर्व घाटांवर दिवे लावले जातील. याशिवाय 14 संलग्न महाविद्यालये, 37 मध्यवर्ती महाविद्यालये आणि 40 स्वयंसेवी संस्थांमधील सुमारे 30,000 स्वयंसेवक या उपक्रमात सक्रियपणे सहभागी होणार आहेत. घाटांवर दिव्यांची संख्या आणि स्वयंसेवकांचे वाटप आधीच ठरलेले आहे.

घाटांवर दिवे आणि स्वयंसेवकांची संख्या
अवध विद्यापीठाने घाटांवर लावले जाणारे दिवे आणि तैनात करण्यात येणाऱ्या स्वयंसेवकांची सविस्तर आकडेवारीही प्रसिद्ध केली आहे. उदाहरणार्थ, राम की पैडीच्या घाट 1 वर 65,000 दिवे लावण्यासाठी 765 स्वयंसेवक तैनात केले जातील, तर 447 स्वयंसेवक घाट 2 वर 38,000 दिवे लावण्यासाठी जबाबदार असतील. तसेच घाट क्रमांक 3 मध्ये 48 हजार दिव्यांच्या कामासाठी 565 स्वयंसेवक तर 61 हजार दिव्यांच्या कामासाठी 718 स्वयंसेवक घाट 4 येथे तैनात करण्यात येणार आहेत. 

स्वयंसेवकांचा सहभाग आणि आयकार्ड वितरण
दीपोत्सवाचे नोडल अधिकारी प्रा. संत शरण मिश्रा म्हणाले की, 30 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या दीपोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 24 ऑक्टोबरपासून दिव्यांची खेप घाटांवर येण्यास सुरुवात झाली असून, घाटांवर दिवे लावण्याचे काम 25 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. स्वयंसेवकांच्या आय-कार्डचे वितरणही सुरू झाले असून, त्यापैकी 15 हजारांहून अधिक आय-कार्ड संस्थांच्या अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. शुक्रवारपर्यंत सर्व संस्थांना आय-कार्ड उपलब्ध करून दिले जातील.

विश्वविक्रम होणार
शरयू नदीच्या 55 घाटांवर 28 लाखांहून अधिक दिवे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे अयोध्येत विश्वविक्रम होईल.

Web Title: Ayodhya Deepotsav 2024: Lighting of 28 lakh lamps on 55 ghats in Ayodhya; Shri Ram Janmabhoomi will shine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.