रामललांच्या दर्शनासाठी आतुर भक्तांनी मोठा विक्रम केला, देणगी देण्याच्या बाबतीत इतिहास रचला!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 09:36 AM2024-01-27T09:36:04+5:302024-01-27T09:37:01+5:30

गेल्या 5 दिवसांपासून भाविक येथे मुक्त हस्ते देणग्या देत आहेत.

Ayodhya ram mandir Eager Devotees Set Big Record For Ramlal's Darshan, Create History In Donation | रामललांच्या दर्शनासाठी आतुर भक्तांनी मोठा विक्रम केला, देणगी देण्याच्या बाबतीत इतिहास रचला!

रामललांच्या दर्शनासाठी आतुर भक्तांनी मोठा विक्रम केला, देणगी देण्याच्या बाबतीत इतिहास रचला!

अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या भव्य दिव्य मंदिरात रामलला विराजमान झाले आहेत. यानंतर आता दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भक्त गर्दी करत आहेत. यातच, राम भक्तांकडून ज्या भक्ती-भावाने आणि उत्साहाने देणगी दिली जात आहे, हे पाहून, भाविकांकडून अर्पन केल्या जात असलेल्या देणगीच्या बाबतीत देशातील इतर अनेक मंदिरे मागे सुटतील असे वाटते. या मंदिरातील आजचा हा सहावा दिवस आहे. गेल्या 5 दिवसांपासून भाविक येथे मुक्त हस्ते देणग्या देत आहेत.

राम मंदिराला विक्रमी देणग्या -
अयोध्येतील राम मंदिराला 22 जानेवारीला 8 लाख रुपयांची देणगी मिळाली. 23 जानेवारीला राम भक्तांनी 2 कोटी 89 लाख रुपये अर्पण केले. 24 जानेवारीला राम मंदिरात भाविकांनी 14 लाख रुपये अर्पण केले. ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, भाविकांकडून मंदिरामध्ये रोज 15 ते 20 लाख रुपये अर्पण केले जात आहेत. आतापर्यंत भाविकांनी 3.50 कोटी रुपये अर्पण केले आहेत.

अयोध्येत सातत्याने वाढतेय भक्तांची गर्दी -
अयोध्येत ज्या पद्धतीने रामभक्तांची संख्या वाढत आहे. ते पाहता, रामललाच्या दर्शनासाठी रोज येणाऱ्या भाविकांची संख्या हळूहळू 3 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही संख्या श्री रामजन्मभूमीला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल. शुक्रवारीही साडेतीन लाखांहून अधिक भाविक येथे पोहोचले.
 

Web Title: Ayodhya ram mandir Eager Devotees Set Big Record For Ramlal's Darshan, Create History In Donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.